Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदींची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केला विचारविनिमय

मोदींची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केला विचारविनिमय

पुढील महिन्यात सादर होणार असलेल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत देशातील मान्यवर अर्थतज्ज्ञ आणि औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 05:13 AM2019-06-23T05:13:16+5:302019-06-23T05:13:38+5:30

पुढील महिन्यात सादर होणार असलेल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत देशातील मान्यवर अर्थतज्ज्ञ आणि औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा केली.

Narendra Modi Discussion witheconomists | मोदींची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केला विचारविनिमय

मोदींची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केला विचारविनिमय

नवी दिल्ली  -  पुढील महिन्यात सादर होणार असलेल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत देशातील मान्यवर अर्थतज्ज्ञ आणि औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा केली. मोदी यांनी त्यांच्याशी सध्याच्या आर्थिक स्थितीवर चर्चा केली, तसेच अर्थव्यवस्थेच्या उत्थानासाठी त्यांच्या सूचना जाणून घेतल्या.
नीती आयोगाने या बैठकीचे आयोजन केले होते. ‘आर्थिक धोरण : पुढील मार्ग’ हा बैठकीचा विषय होता. ४0 अर्थतज्ज्ञ आणि इतर जाणकार बैठकीला उपस्थित होते. स्थूल अर्थव्यवस्था व रोजगार, कृषी व जलसंपदा, निर्यात, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्यांवर जाणकारांनी आपली मते मांडली. या बैठकीला वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री राव इंद्रजितसिंग, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.
बँकिंग आणि विमा क्षेत्र थेट विदेशी गुंतवणुकीसाठी आणखी खुले करण्यासह अनेक विषयांवर चर्चा झाली. निर्गुंतवणुकीला आणखी गती, आर्थिक वृद्धीसाठी प्रयत्न करणे, या मुद्यांवर तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केली.

Web Title: Narendra Modi Discussion witheconomists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.