Lokmat Money > बिझनेस न्यूज > बहुतांश सरकारी बँका बंदच करायला हव्या! - अनिल सिंघवी

बहुतांश सरकारी बँका बंदच करायला हव्या! - अनिल सिंघवी

बहुतांश सरकारी बँका बंद करण्याची वेळ आली आहे. किमान त्यांचे एकीकरण तरी व्हायला हवे, असे प्रतिपादन आयकॅन इन्व्हेस्टमेंट या गुंतवणूक संस्थेचे प्रमुख अनिल सिंघवी यांनी केले आहे. पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:59 AM2018-02-16T03:59:10+5:302018-02-16T03:59:16+5:30

बहुतांश सरकारी बँका बंद करण्याची वेळ आली आहे. किमान त्यांचे एकीकरण तरी व्हायला हवे, असे प्रतिपादन आयकॅन इन्व्हेस्टमेंट या गुंतवणूक संस्थेचे प्रमुख अनिल सिंघवी यांनी केले आहे. पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले.

Most of the government banks should be closed! - Anil Singhvi | बहुतांश सरकारी बँका बंदच करायला हव्या! - अनिल सिंघवी

बहुतांश सरकारी बँका बंदच करायला हव्या! - अनिल सिंघवी

नवी दिल्ली : बहुतांश सरकारी बँका बंद करण्याची वेळ आली आहे. किमान त्यांचे एकीकरण तरी व्हायला हवे, असे प्रतिपादन आयकॅन इन्व्हेस्टमेंट या गुंतवणूक संस्थेचे प्रमुख अनिल सिंघवी यांनी केले आहे. पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
एका मुलाखतीत सिंघवी यांनी सांगितले की, हा एका हिरे व्यापाºयाचा (नीरव मोदी) घोटाळा आहे, असे मला वाटत नाही. अनेक हिरे व्यापारी बँकेला दीर्घ काळापासून लुटत आले असावेत. यापूर्वीही अशा घटना उघडकीस आल्या आहेत. पंजाब नॅशनल बँक भूतकाळातील आपल्या चुकांपासून काहीही शिकलेली नाही. त्यांच्या जोखीम व्यवस्थापन यंत्रणेत दोष आहेत. त्याचा लोकांनी फायदा घेतला आहे.
सिंघवी म्हणाले की, उघडकीस आलेल्या घोटाळ्यातील रक्कम प्रचंड मोठी आहे. पंजाब नॅशनल बँकेचे एकूण बाजार भांडवल ३० हजार कोटी रुपये आहे आणि बँकेला ११ हजार कोटी रुपयांचा चुना लावला. एकाच घोटाळ्यात बँकेचे एकतृतीयांश बाजार भांडवल लंपास झाले आहे. अनेक वर्षांपासून बँकेचा पैसा लुटला जात होता आणि बँक झोपा घेत होती.

विलीन करा
सिंघवी यांनी सांगितले की, वारंवार उघडकीस येत असलेल्या घोटाळ्यातून एक बाब समोर येते की, बँका अनुभवातून काहीच शिकायला तयार नाहीत. शहाण्या बँका दुसºयांच्या चुकांमधूनही शिकतात. आपल्या बँका स्वत:च्याच चुकांमधून काही शिकायला तयार नाहीत. त्याच त्याच चुका बँका वारंवार करीत आहेत. मला तर वाटते की, पंजाब नॅशनल बँकेला तातडीने दुसºया बँकेत विलीन करायला हवे.

Web Title: Most of the government banks should be closed! - Anil Singhvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक