Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेल्वेच्या १००% विद्युतीकरणाला मोदींचा ब्रेक!

रेल्वेच्या १००% विद्युतीकरणाला मोदींचा ब्रेक!

देशातील रेल्वे मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्याच्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रेक लावला आहे. पंतप्रधान कार्यालयात रेल्वे मंत्रालयाच्या कामाचा आढावा घेण्यात आला, तेव्हा मोदी यांनी सध्याचे जाळे मोडीत काढण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केल्याचे समजते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:59 AM2018-04-03T01:59:15+5:302018-04-03T01:59:15+5:30

देशातील रेल्वे मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्याच्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रेक लावला आहे. पंतप्रधान कार्यालयात रेल्वे मंत्रालयाच्या कामाचा आढावा घेण्यात आला, तेव्हा मोदी यांनी सध्याचे जाळे मोडीत काढण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केल्याचे समजते.

 Modi breaks 100% electrification of railway! | रेल्वेच्या १००% विद्युतीकरणाला मोदींचा ब्रेक!

रेल्वेच्या १००% विद्युतीकरणाला मोदींचा ब्रेक!

नवी दिल्ली - देशातील रेल्वे मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्याच्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रेक लावला आहे. पंतप्रधान कार्यालयात रेल्वे मंत्रालयाच्या कामाचा आढावा घेण्यात आला, तेव्हा मोदी यांनी सध्याचे जाळे मोडीत काढण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केल्याचे समजते.
पीयूष गोयल यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रेल्वेमंत्री पदाचा कार्यभार घेतला. तेव्हापासून त्यांनी रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाची योजना आक्रमकपणे राबवायला सुरुवात केली आहे. डिझेल आणि अन्य इंधनावर चालणाऱ्या रेल्वेचे अस्तित्वात असलेले व्यापक पायाभूत जाळे मोडीत काढून विजेवर चालणारी नवी व्यवस्था निर्माण करण्यात कोणते शहाणपण आहे, असा प्रश्न पंतप्रधानांना पडला होता. डिझेलची ५,८०० इंजिने सध्या रेल्वेकडे आहेत. ही सर्व इंजिने विद्युतीकरण प्रक्रियेमुळे बाद ठरतील. एकदम एवढी मोठी व्यवस्था कामातून काढून टाकले, ही चांगली कल्पना नव्हे, असे मतही पंतप्रधानांनी व्यक्त केले.
विद्युतीकरण ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिची कालमर्यादा उपलब्ध भांडवलानुसार ठरायला हवी. हे बदल तात्काळ होता कामा नयेत. डिझेल मालमत्तेचे स्वत:चे आयुष्य आहे. त्यानुसार कालबद्ध पद्धतीने बदल होत राहावेत, असे या बैठकीत ठरले. या बैठकीला गोयल यांच्यासह संपूर्ण रेल्वे बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत १०० टक्के विद्युतीकरण धोरणाला बैठकीत स्थगिती देण्यात आली. त्याऐवजी दरवर्षी गरजेनुसार विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्युतीकरण व अन्य भांडवली खर्चाची रक्कम स्वत:च्या उत्पन्नातून उभी करण्यास रेल्वेने प्राधान्य द्यावे, यात पंतप्रधानांना अधिक रस आहे, असे सूत्रांनी सांगितले.

३८ हजार किमीचे विद्युतीकरण

लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२२ सालापर्यंत रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण करण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने यापूर्वीच केली आहे.
१०० टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३८ हजार किमी ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे रेल्वेने ठरविले.

Web Title:  Modi breaks 100% electrification of railway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.