lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मॅकडोनाल्डसची भारतातील १६९ आऊटलेट्स बंद होणार; हजारो कर्मचाऱ्यांच्या जाणार नोकऱ्या

मॅकडोनाल्डसची भारतातील १६९ आऊटलेट्स बंद होणार; हजारो कर्मचाऱ्यांच्या जाणार नोकऱ्या

मॅकडोनाल्डसमधील ही धमाल संपण्याची चिन्हं दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 10:03 AM2017-08-22T10:03:09+5:302017-08-22T10:06:53+5:30

मॅकडोनाल्डसमधील ही धमाल संपण्याची चिन्हं दिसत आहेत.

McDonald's closes 169 outlets in India; Thousands of employees will go for jobs | मॅकडोनाल्डसची भारतातील १६९ आऊटलेट्स बंद होणार; हजारो कर्मचाऱ्यांच्या जाणार नोकऱ्या

मॅकडोनाल्डसची भारतातील १६९ आऊटलेट्स बंद होणार; हजारो कर्मचाऱ्यांच्या जाणार नोकऱ्या

Highlightsमॅकडोनाल्डसमधील ही धमाल संपण्याची चिन्हं दिसत आहेत. मॅकडोनाल्डस इंडियाने कनॉट प्लाझा रेस्टॉरन्ट लिमिटेड (सीपीआरएल) बरोबरचे सर्व व्यावसायिक करार रद्द केल्याने उत्तर आणि पूर्व भारतातील मॅकडोनाल्डची १६९ आऊटलेट्स बंद होणार आहेत

नवी दिल्ली, दि. 22- मॅकडोनाल्डस सगळ्यांचीच आवडीची जागा असते. सगळेच जण तिथे जाणं पसंत करतात. मॅकडोनाल्डसमध्ये तास-तासभर बसण्याची तर पद्धतच आहे. पण आता मॅकडोनाल्डसमधील ही धमाल संपण्याची चिन्हं दिसत आहेत. मॅकडोनाल्डस इंडियाने कनॉट प्लाझा रेस्टॉरन्ट लिमिटेड (सीपीआरएल) बरोबरचे सर्व व्यावसायिक करार रद्द केल्याने उत्तर आणि पूर्व भारतातील मॅकडोनाल्डची १६९ आऊटलेट्स बंद होणार आहेत. त्यामुळे मॅकडोनाल्डसमध्ये काम करणाऱ्या दहा हजारपेक्षा जास्त कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे.   द टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

कनॉट प्लाजा रेस्टॉरन्ट लिमिटेड (सीपीआरएल)ने अटींचा भंग केल्याने आणि नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने मॅकडोनॉल्डस इंडियाने सीपीआरएल सोबतचे सर्व व्यावसायिक करार रद्द केले आहेत. मॅकडोनाल्डस इंडियाने सीपीआरएलला नोटीस पाठवून त्यांच्या रेस्टॉरन्टमध्ये मॅकडोनाल्डसचे ब्रँड न वापरण्यास बजावलं आहे. त्यामुळे सीपीआरएलला मॅकडोनाल्डसचे नाव, चिन्ह आणि कॉपी राईटसचा वापर करता येणार नाही. मॅकडोनाल्डसने सीपीआरएलला १५ दिवसाची नोटीस दिली असून त्यानंतर त्यांना कंपनीचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. मात्र मॅकडोनाल्डस इंडियाच्या या निर्णयामुळे हजारो कामगारांना नोकरीला मुकावे लागणार आहे. यापूर्वीही सीपीआरएलने दिल्लीत त्यांचे ४३ रेस्टॉरन्ट बंद केले होते.

उद्योगपती विक्रम बख्शी यांची सीपीआरएल ही कंपनी आहे. सीपीआरएलमध्ये मॅकडोनाल्डचीही भागीदारी आहे. या कंपनीचा आणि मॅकडोनाल्डस इंडियाचा गेल्या काही वर्षापासून वाद सुरू होता. कंपनीच्या व्यवस्थापनाशी हा वाद निगडीत होता. दरम्यान, करार रद्द करण्याचा निर्णय म्हणजे एनसीएलटीच्या निर्णयाला आव्हान असल्याचं बख्शी यांनी म्हटलं आहे. एनसीएलटीने सीपीआरएल बोर्डाची बैठक बोलावून विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्या आधीच करार रद्द करणे योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
या निर्णयामुळे दहा हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. मॅकडोनाल्डसच्या प्रत्येक आऊटलेटमध्ये चाळीस ते साठ कर्मचारी असतात. कर्मचाऱ्यांची संख्या त्या आऊटलेटच्या आकारावर अवलंबून असते. पण यामध्ये कॉर्पोरेट कर्मचारी आणि पुरवठादारांचा समावेश नाही, असं मॅकडोनाल्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
 

Web Title: McDonald's closes 169 outlets in India; Thousands of employees will go for jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.