Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५२,६८६ गाड्यांच्या ब्रेकची मारुती करणार फेरतपासणी  

५२,६८६ गाड्यांच्या ब्रेकची मारुती करणार फेरतपासणी  

ब्रेक व्हॅक्यूम होज सदोष असल्याचे आढळून आल्यामुळे ५२,६८६ नव्या स्विफ्ट आणि बालेनो गाड्यांची मारुती सुझुकी इंडियाकडून तपासणी करण्यात येणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:39 AM2018-05-09T00:39:58+5:302018-05-09T00:39:58+5:30

ब्रेक व्हॅक्यूम होज सदोष असल्याचे आढळून आल्यामुळे ५२,६८६ नव्या स्विफ्ट आणि बालेनो गाड्यांची मारुती सुझुकी इंडियाकडून तपासणी करण्यात येणार आहे.

Maruti Car News | ५२,६८६ गाड्यांच्या ब्रेकची मारुती करणार फेरतपासणी  

५२,६८६ गाड्यांच्या ब्रेकची मारुती करणार फेरतपासणी  

नवी दिल्ली - ब्रेक व्हॅक्यूम होज सदोष असल्याचे आढळून आल्यामुळे ५२,६८६ नव्या स्विफ्ट आणि बालेनो गाड्यांची मारुती सुझुकी इंडियाकडून तपासणी करण्यात येणार आहे. दोन्ही मॉडेलच्या गाड्या असलेल्या मालकांनी आपल्या गाड्या कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊन सुरक्षा तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कंपनीने केले आहे.
मारुती सुझुकी कंपनीच्या माहितीनुसार, १ डिसेंबर २०१७ आणि १६ मार्च २०१८ या कालावधीत उत्पादन झालेल्या गाड्यांचीच तपासणी केली जाणार आहे. या काळात स्विफ्ट मॉडेलच्या ४४,९८२ गाड्या, तर बालेनो मॉडेलच्या ७,७०४ गाड्यांचे उत्पादन झाले. या गाड्यांची नव्याने तपासणी करण्यात येईल. ही तपासणी आणि बदल विनामूल्य करण्यात येणार आहेत.

Web Title: Maruti Car News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.