Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजाराच्या तेजीला ब्रेक; निर्देशांकांमध्ये घसरण

बाजाराच्या तेजीला ब्रेक; निर्देशांकांमध्ये घसरण

अर्थव्यवस्थेने गाठलेली पाच तिमाहींमधील सर्वाधिक वाढ ही एक सकारात्मक बाब सोडल्यास गतसप्ताह बाजारासाठी फारसा लाभदायक राहिला नाही. जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसलेला दिसून आला. यामुळेच शेअर बाजारातील बहुसंख्य निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस लाल रंगात बंद झालेले दिसून आले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:14 AM2018-03-05T01:14:15+5:302018-03-05T01:14:15+5:30

अर्थव्यवस्थेने गाठलेली पाच तिमाहींमधील सर्वाधिक वाढ ही एक सकारात्मक बाब सोडल्यास गतसप्ताह बाजारासाठी फारसा लाभदायक राहिला नाही. जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसलेला दिसून आला. यामुळेच शेअर बाजारातील बहुसंख्य निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस लाल रंगात बंद झालेले दिसून आले.

 Market rally; Falling in the index | बाजाराच्या तेजीला ब्रेक; निर्देशांकांमध्ये घसरण

बाजाराच्या तेजीला ब्रेक; निर्देशांकांमध्ये घसरण

- प्रसाद गो. जोशी

अर्थव्यवस्थेने गाठलेली पाच तिमाहींमधील सर्वाधिक वाढ ही एक सकारात्मक बाब सोडल्यास गतसप्ताह बाजारासाठी फारसा लाभदायक राहिला नाही. जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसलेला दिसून आला. यामुळेच शेअर बाजारातील बहुसंख्य निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस लाल रंगात बंद झालेले दिसून आले. यामुळे मागील सप्ताहातील तेजीला ब्रेक लागला.
सप्ताहाचा प्रारंभ बाजारात उत्साहाने झाला असला, तरी त्यानंतर मात्र उर्वरित सप्ताह हा मंदीचा राहिला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३४२२५.७२ असा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर, तो ३४६१०.७९ ते ३४०१५.७९ अंशांदरम्यान वर-खाली जात सप्ताहाच्या अखेरीस ३४०४६.९४ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ९५.२१ अंशांची घट झाली आहे. शुक्रवारी बाजार धूलिवंदनानिमित्त बंद होता.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३२.७० अंशांनी खाली येऊन १०४५८.३५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप या क्षेत्रीय निर्देशांकानेही १३०.७६ अंशांची घट नोंदविली आणि तो १६४६१.२७ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप या निर्देशांकामध्ये मात्र वाढ झाली. सप्ताहाच्या अखेरीस तो ८८.७२ अंशांनी वाढून १८०८४.९४ अंशांवर बंद झाला. सप्ताहामध्ये अर्थव्यवस्थेची तिसºया तिमाहीची आकडेवारी जाहीर झाली. या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा वेग ७.२ टक्कयांवर गेला आहे. आधीच्या तिमाहीत तो ६.५ टक्के होता. गेल्या पाच तिमाहींमधील हा उच्चांक आहे. उत्पादन आणि कृषि क्षेत्राने दिलेल्या वाढीच्या जोरावर हा बदल झालेला दिसून आला.
अमेरिकेने पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवर लादलेल्या आयात करामुळे व्यापार युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच फेडरल रिझर्व्हच्या चेअरमननी अर्थव्यवस्थेवर काही बंधने लादण्याच्या केलेल्या सुतोवाचाने बाजार खाली आले.

जगातील ५०० अब्जोपतींनी गमावले १०७ अब्ज डॉलर

जागतिक शेअर बाजारामध्ये
झालेल्या घसरणीमुळे जगातील सर्वाधिक श्रीमंत ५०० व्यक्तींची संपत्ती १०७ अब्ज डॉलरने कमी
झाली आहे. याचा सर्वाधिक फटका फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गना बसला आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये ३.२
अब्ज डॉलरची घट झाली आहे.
झुकेरबर्ग पाठोपाठ स्पेनचे अमान्सिओ ओर्टेगा आणि मेक्सिकोच्या कार्लाेस स्लीम यांना प्रत्येकी २.४ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना प्रत्येकी २ अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागत आहे. अमेरिकेच्या अब्जोपतींची ३४ अब्ज डॉलरची तर चिनी
श्रीमंतांची १६ अब्ज डॉलरची संपत्ती या सप्ताहात कमी झाली आहे.
राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओढावून घेतलेले व्यापार युद्ध आणि फेडरल रिझर्व्हच्या चेअरमननी लवकरच अर्थव्यवस्थेवर काही निर्बंध आणण्याची व्यक्त केलेली शक्यता यामुळे जागतिक शेअर बाजार खाली आले आहेत.

Web Title:  Market rally; Falling in the index

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.