Lokmat Money > बिझनेस न्यूज > पतंजलीचा 'दबदबा' संपला की काय? विक्री मंदावण्याचे कारण काय?

पतंजलीचा 'दबदबा' संपला की काय? विक्री मंदावण्याचे कारण काय?

मागील वर्षी साडे दहा हजार कोटींचा व्यवसाय करणारी कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 09:50 AM2018-08-17T09:50:51+5:302018-08-17T09:55:06+5:30

मागील वर्षी साडे दहा हजार कोटींचा व्यवसाय करणारी कंपनी

low growth rates for patanjali as rival launches herbal products | पतंजलीचा 'दबदबा' संपला की काय? विक्री मंदावण्याचे कारण काय?

पतंजलीचा 'दबदबा' संपला की काय? विक्री मंदावण्याचे कारण काय?

 नवी दिल्ली : कोलगेट, नेसले सारख्या दिग्गज कंपन्यांना आपल्या आयुर्वेदिक उत्पादनांनी टक्कर देणारी योगगुरु रामदेव बाबा यांची पतंजली कंपनीची विक्री यंदा घसरली आहे. मागील वर्षी साडे दहा हजार कोटींचा व्यवसाय करणारी कंपनीची विक्री मंदावली आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही आयुर्वेदिक उत्पादने बाजारात आणल्याल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत पतंजलीच्या उत्पादनांची विक्री 50 टक्क्यांनी घटली आहे. 


कॅटर वर्ल्डपॅनलच्या आकडेवारीनुसार पतंजलीच्या एकूण विक्रीमध्ये ऑक्टोबर 2017 ते मार्च 2018 या काळात 7 टक्कयांची वाढ नोंदवली गेली तर एप्रिल ते सप्टेंबर 2017 या काळात ही वाढ 22 टक्के होती. ही वाढ 2016 च्या तुलनेत 52 ते 49 टक्यांनी घटली आहे. 
पतंजलीसाठी धोक्याची घंटा देणारा हा दुसरा अहवाल आहे. काही दिवसांपूर्वीच क्रेडिट सुइसने दिलेल्या अहवालात 2018 मध्ये चार वर्षांनंतर पतंजलीच्या विक्रीत कोणतीही वाढ झाली नसल्याचे म्हटले होते. तत्पुर्वी पतंजलीचा विकास दर हा 100 टक्के एवढा होता. 

पतंजलीचे प्रवक्ता एस. के. ताजारावाला यांनी सांगितले की, एफएमसीजी क्षेत्रामध्ये पतंजली हीच सर्वाधिक वाढ असलेली कंपनी आहे. आता बाजारात कंपनीने आपले स्थान प्रस्थापित केले आहे. शेअर्समध्येही वाढ होत आहे. ही वाढ दुसऱ्या कंपन्यांसारखीच आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांना आव्हान दिले आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पंतंजलीच्या वाढीमागे नवेपण आणि रामदेव बाबा यांना मानणाऱ्या लोकांनी त्यांची उत्पादने स्वीकारल्याचे मुख्य कारण आहे. तसेच उत्पादनांच्या प्रत्येक श्रेणीमध्ये वेगात आयुर्वेदिक उत्पादने आणल्याने ही वाढ झाली होती. एका शेअर ब्रोकरेज एजन्सीने सांगितले की, पतंजलीच्या शेअरमध्ये केवळ टूथपेस्ट आणि मधाच्या उत्पादनामना वाढ मिळाली आहे. साबन, खाद्यतेलाचा शेअर तेवढाच राहिला आहे, तर शाम्पू, लोणी या सेगमेंटमध्ये शेअर घसरला आहे. 

Web Title: low growth rates for patanjali as rival launches herbal products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.