Lokmat Money > बिझनेस न्यूज > ७९ हजार कोटींचा तोटा तरीही बँक कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढ

७९ हजार कोटींचा तोटा तरीही बँक कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढ

२0१७-१८ मध्ये सरकारी बँकांची कामगिरी अत्यंत सुमार राहिली असली, तरी या बँकांच्या कर्मचा-यांना खासगी बँकांच्या कर्मचा-यांच्या तुलनेत प्रचंड मोठी वेतनवाढ मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 03:58 AM2018-07-21T03:58:57+5:302018-07-21T03:59:06+5:30

२0१७-१८ मध्ये सरकारी बँकांची कामगिरी अत्यंत सुमार राहिली असली, तरी या बँकांच्या कर्मचा-यांना खासगी बँकांच्या कर्मचा-यांच्या तुलनेत प्रचंड मोठी वेतनवाढ मिळाली आहे.

The loss of 7,9 thousand crores, but the bank employees will get bigger salary increases | ७९ हजार कोटींचा तोटा तरीही बँक कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढ

७९ हजार कोटींचा तोटा तरीही बँक कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढ

नवी दिल्ली : २0१७-१८ मध्ये सरकारी बँकांची कामगिरी अत्यंत सुमार राहिली असली, तरी या बँकांच्या कर्मचा-यांना खासगी बँकांच्या कर्मचा-यांच्या तुलनेत प्रचंड मोठी वेतनवाढ मिळाली आहे.
२0१७-१८ मध्ये सर्व सरकारी बँकांना एकत्रितरीत्या ७९ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कुकर्जांचा आकडाही वाढून ८.६ लाख कोटींवर गेला आहे. याशिवाय या बँकांमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक घोटाळेही झाले आहेत. असे असले, तरी मार्च २0१८ला संपलेल्या वर्षात सरकारी बँकांच्या कर्मचाºयांना वार्षिक आधारावर ९.७ टक्के वेतनवाढ मिळाली आहे. त्यामुळे या बँकांच्या कर्मचाºयांचे वार्षिक वेतन आता ११.४८ लाख रुपयांवर गेले आहे. विडंबना म्हणजे १४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा महाघोटाळा झालेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाºयांना सर्वाधिक ६४.५ टक्के इतकी
विक्रमी वेतनवाढ मिळाली आहे. या बँकेच्या कर्मचाºयांचे वार्षिक वेतन आता १२.३२ लाख रुपये झाले आहे.
जागतिक बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अनुत्पादक भांडवलाच्या बाबतीत १५0 देशांच्या यादीत भारत तिसºया स्थानावर आला आहे. याला सरकारी बँकांची सुमार कामगिरी जबाबदार आहे.
देशातील खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांची आपल्या कर्मचाºयांवरील खर्चात फार मोठी वाढ झाली आहे. बँकांमधील कर्मचाºयांच्या निवृत्तीनंतरच्या लाभांत झालेली वाढ, तसेच वाढीव
निवृत्ती वय यामुळे हा खर्च वाढला आहे. सरकारी बँकांतील कर्मचाºयांचे सरासरी वय ४0 वर्षे असून, खासगी बँकांचे ३0 वर्षे आहे. कर्मचाºयांच्या निवृत्तीनंतरच्या लाभावरील खर्चही
२५ ते ३0 टक्के आहे.
>खासगी बँकांना केवळ २.६ टक्के
या तुलनेत अत्यंत चांगली कामगिरी करणाºया खासगी बँकांच्या कर्मचाºयांना मात्र वार्षिक आधारावर अवघी २.६ टक्के वेतनवाढ मिळाली असून, त्यांचे सरासरी वार्षिक वेतन ७.७ लाख झाले आहे.

Web Title: The loss of 7,9 thousand crores, but the bank employees will get bigger salary increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक