Lokmat Money > बिझनेस न्यूज > लंडनची आर्सेलर मित्तल एस्सार पोर्टही विकत घेणार

लंडनची आर्सेलर मित्तल एस्सार पोर्टही विकत घेणार

आर्थिक संकटात सापडलेल्या एस्सार स्टीलसाठी ५४००० कोटींची बोली लावल्यानंतर आता लंडनची आर्सेलर मित्तल एस्सारचे हाझिरा बंदर व औष्णिक विद्युत प्रकल्पही घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 08:08 AM2019-02-21T08:08:36+5:302019-02-21T08:08:42+5:30

आर्थिक संकटात सापडलेल्या एस्सार स्टीलसाठी ५४००० कोटींची बोली लावल्यानंतर आता लंडनची आर्सेलर मित्तल एस्सारचे हाझिरा बंदर व औष्णिक विद्युत प्रकल्पही घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

London's ArcelorMittal Essar Port will also buy | लंडनची आर्सेलर मित्तल एस्सार पोर्टही विकत घेणार

लंडनची आर्सेलर मित्तल एस्सार पोर्टही विकत घेणार

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या एस्सार स्टीलसाठी ५४००० कोटींची बोली लावल्यानंतर आता लंडनची आर्सेलर मित्तल एस्सारचे हाझिरा बंदर व औष्णिक विद्युत प्रकल्पही घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एस्सार स्टीलने विविध बँकांचे ४८००० कोटी थकविल्यानंतर या बँकांनी गेल्या वर्षी नॅशनल कंपनी लॉ ट्रॉयब्युनलकडे एस्सार स्टीलला दिवाळखोर घोषित करण्याचा अर्ज केला. त्यावर एनसीएलटीने एस्सार स्टील विकण्यासाठी निविदा मागवल्या. त्यात लक्ष्मीनिवास मित्तल यांच्या आर्सेलर मित्तल यांनी ५४००० कोटींची बोली लावली. त्यावर एस्सारच्या रुईया बंधूंनी ४८००० कोटींचे कर्ज फेडण्याची तयारी दर्शवून विक्रीला स्थगिती मिळवली. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. या समूहाचे बारमाही सुरू राहणारे एक बंदर गुजरातच्या हझिरामध्ये आहे.

Web Title: London's ArcelorMittal Essar Port will also buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.