- नितीन अग्रवाल 
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेत नगदी चलन कमी करण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना अर्थतज्ज्ञ भलेही संशयाच्या नजरेने बघत असले तरी सरकारने त्यासाठी तरुणांकडे आपला मोर्चा वळविला आहे. कॅशलेस व्यवहारांना नियंत्रित करणाºया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (एनपीसीआय) माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल पेमेंटचे धडे देण्यात येणार आहेत. याची सुरुवात मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू व चेन्नईध्ये झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनपीसीआयने ‘कॅम्पस कनेक्ट’ नावाने एक डिजिटल साक्षरता कार्यक्रम सुरू केला आहे. त्याद्वारे मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू व चेन्नईमध्ये व्यवस्थापनाचे शिक्षण देणाºया संस्थांतील तसेच ३५ विद्यापीठांतील तीन हजारांहून अधिक विद्यार्र्थ्यांना या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे.
एनपीसीआयच्या अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या फायद्यांबाबत विस्ताराने माहिती देण्यात येईल. त्यांनी त्या माहितीच्या आधारे अन्य लोकांनाही प्रोत्साहन द्यावे, असे सांगण्यात येईल. प्रामुख्याने एनपीसीआयकडून संचलित युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) व भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) याच्या उपयोगाची माहिती देण्यात येणार आहे. यूपीआय आणि भीम अ‍ॅप अधिक सहज व सोपे बनविण्यासाठी तरुणांकडून सूचना मागविण्यात येतील.
एनपीसीआयचा दावा आहे की, भीम अ‍ॅप पूर्णपणे त्रुटीविरहित आहे आणि ते अतिशय वेगाने लोकप्रिय होत आहे. यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. या वर्षी मार्चपर्यंत ३६१ कोटी रुपयांचे देवाणघेवाणीचे व्यवहार भीमद्वारे झाले. त्यावरून याच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.
या अ‍ॅपमुळे सर्व बँकांची देवाणघेवाणीची सुविधा एकाचजागी उपलब्ध झाली आहे.
यापूर्वी नागरिकांना डिजिटल देवाणघेवाणीसाठी बँकांनी दिलेल्या वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग करावा लागत होता.

देशी क्रेडिट कार्ड
एनपीसीआयने अलीकडेच देशी क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. रुपे पॉवर कार्डचा उपयोग व्हिसा वा मास्टरकार्ड पॉवर्ड व अन्य क्रेडिट कार्डसारखाच पेमेंटसाठी केला जाऊ शकतो.
सध्या सार्वजनिक क्षेत्रातील आंध्र बँक, कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक, सेंट्रल बँक, आयडीबीआय, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक व विजया बँक यांनी आपल्या ग्राहकांना ते उपलब्ध करून दिले आहे.
खासगी क्षेत्रातील एचडीएफसी व सहकारी क्षेत्रातील पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेकडून रुपे क्रेडिट कार्ड जारी करण्यात येत आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.