Lokmat Money > बिझनेस न्यूज > तीन वर्षांत १९,६७३ कोटींचे घोटाळे, २0 जणांनाच शिक्षा, १८४ जण फरार

तीन वर्षांत १९,६७३ कोटींचे घोटाळे, २0 जणांनाच शिक्षा, १८४ जण फरार

बँकांतील घोटाळ्यांची चर्चा जोरात सुरू असतानाच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे २0१५ ते २0१७ या काळात ३३३ आर्थिक अपराध तसेच घोटाळ्यांची नोंद झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:32 AM2018-03-07T01:32:08+5:302018-03-07T01:32:08+5:30

बँकांतील घोटाळ्यांची चर्चा जोरात सुरू असतानाच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे २0१५ ते २0१७ या काळात ३३३ आर्थिक अपराध तसेच घोटाळ्यांची नोंद झाली आहे.

 In the last three years, 19,673 crore rupees scam, 20 people sentenced and 184 absconding | तीन वर्षांत १९,६७३ कोटींचे घोटाळे, २0 जणांनाच शिक्षा, १८४ जण फरार

तीन वर्षांत १९,६७३ कोटींचे घोटाळे, २0 जणांनाच शिक्षा, १८४ जण फरार

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली -  बँकांतील घोटाळ्यांची चर्चा जोरात सुरू असतानाच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे २0१५ ते २0१७ या काळात ३३३ आर्थिक अपराध तसेच घोटाळ्यांची नोंद झाली आहे.
माहितीच्या अधिकाराखाली जो तपशील उपलब्ध झाला आहे, त्यानुसार २0१५ साली ५५६0 कोटी ६६ लाख, २0१६मध्ये ४२७३ कोटी ८७ लाख तर २0१७मध्ये ९८३८ कोटी ६६ लाख रुपयांच्या घोटाळ्यांचे गुन्हे मुंबई पोलिसांकडे नोंदविण्यात आले आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत त्यातील केवळ २0 गुन्हेगारांना शिक्षा मिळाली असून, ८0 गुन्हेगार पूर्णपणे निर्दोष सुटले आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने २0१५ साली ३२ प्रकरणांत, तर २0१६ साली १६ व २0१७मध्ये केवळ दोन प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
याहून धक्कादायक बाब म्हणजे या आर्थिक गुन्ह्यांतील १८४ जण फरार झाले आणि ७४ प्रकरणांत गुंतवणूकदारांना अडीच कोटी रुपये परत करण्याची वेळ आली. या आकडेवारीच्या आधारे काँग्रेसने मंगळवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला व प्रमोद तिवारी यांच्यासह अन्य नेत्यांनी संसदेबाहेर आरोप केला की, या देशाला काही जण लुटत आहेत आणि सरकार त्यांना मदत करताना दिसत आहे. आतापर्यंतच्या घोटाळ्यांचा उल्लेख करताना सुरजेवाला म्हणाले की, बँक आॅफ बडोदामध्ये ६४00 कोटींचा घोटाळा झाला, विजय मल्ल्याने ९000 कोटींचा घोटाळा केला आणि आता नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांनी २२६0६ कोटींची लूट केली आहे. मेहुल चोक्सीची ‘जन धन लूट’ योजना ५ हजार कोटी रुपयांची होती, रोटोमॅकच्या विक्रम कोठारीने ३६९५ कोटींची लूट केली आणि द्वारकादास ज्वेलर्सचा घोटाळा ३९0 कोटी रुपयांचा आहे. याखेरीज कॅनरा बँकेतील ४१४ कोटींचा घोटाळा तर विनसम घोटाळा ६७१२ कोटी रुपयांचा असल्याचे उघड झाले
आहे.

चौकीदाराचेच लुटारूंना संरक्षण

आणखी बँक घोटाळ्यांची माहिती आपल्याकडे असल्याचे काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आले. ही माहिती आम्ही टप्प्याटप्प्याने जनतेपुढे ठेवणार असून, ज्यांच्याकडे देशाच्या तिजोरीच्या किल्ल्या देण्यात आल्या, त्या चौकीदार म्हणवून घेणारे पंतप्रधान मोदी खजिना सांभाळण्यापेक्षा तो लुटणाºयांचेच रक्षण करताना दिसत आहेत, असेही रणदीप सुरजेवाला म्हणाले.

पंतप्रधानांनी मौन सोडावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन धारण करून आहेत आणि लुटारू पळून गेले आहेत. सरकार डोळेझाक करीत आहे. या घोटाळ्यांनंतर आर्थिक गुन्हे अन्वेषणमधील समोर आलेली माहिती चिंताजनक आहे. आता तरी पंतप्रधानांनी मौन सोडावे आणि देशाची प्रचंड लूट झाली कशी आणि लुटारू पळून कसे गेले, हे लोकांना सांगावे.
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे प्रवक्ते

Web Title:  In the last three years, 19,673 crore rupees scam, 20 people sentenced and 184 absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.