Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘व्हॉल्ट’संबंधी रिझर्व्ह बॅँकेचे नियम जाणून घ्या

‘व्हॉल्ट’संबंधी रिझर्व्ह बॅँकेचे नियम जाणून घ्या

नागपूर : लॉकर रूमसंबंधी रिझर्व्ह बँकेचे नियम जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने रिझर्व्ह बँकेच्याच एका सेवानिवृत्त मुख्य सुरक्षा अधिका-याशी संपर्क साधला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:24 AM2017-11-24T00:24:41+5:302017-11-24T00:24:55+5:30

नागपूर : लॉकर रूमसंबंधी रिझर्व्ह बँकेचे नियम जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने रिझर्व्ह बँकेच्याच एका सेवानिवृत्त मुख्य सुरक्षा अधिका-याशी संपर्क साधला.

Know the Reserve Bank's rules about 'Vault' | ‘व्हॉल्ट’संबंधी रिझर्व्ह बॅँकेचे नियम जाणून घ्या

‘व्हॉल्ट’संबंधी रिझर्व्ह बॅँकेचे नियम जाणून घ्या

सोपान पांढरीपांडे 
नागपूर : लॉकर रूमसंबंधी रिझर्व्ह बँकेचे नियम जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने रिझर्व्ह बँकेच्याच एका सेवानिवृत्त मुख्य सुरक्षा अधिका-याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती वाचकांसाठी देत आहोत..हल्ली रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बनविलेल्या लॉकर रूम्स भारतातही तयार होतात. त्यात गोदरेज, येल, ओझोन, स्टील एज, रोलेक्स, मीरा अरबिंदो या कंपन्या आघाडीवर आहेत.
>रिझर्व्ह बँकेचे स्ट्राँग रूम व लॉकर रूमसाठी नियम
स्ट्राँग रूम/लॉकर रूमसाठी निवडलेल्या जागेला तिन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रिटच्या भिंती बांधून मुख्य इमारतीपासून वेगळे करणे आवश्यक आहे. शिवाय लॉकर रूमचा तळ सिमेंट अथवा १८ मि.मी. लोखंडी प्लेटचा असणे आवश्यक.
सिमेंट काँक्रिटच्या या भिंतीची जाडी कमीतकमी एक फूट असणे आवश्यक आहे.
स्ट्राँग रूम/लॉकर रूमचा दरवाजा
१ मीटर (३.२५ फूट)पेक्षा अधिक नको व दरवाजाला दोन्हीकडून सरकत जाणारी लोखंडी ग्रिल असणे आवश्यक आहे. हा दरवाजा फक्त २१ इंच उघडा ठेवावा व एकावेळी एकच व्यक्ती आत/बाहेर जाऊ शकेल.
लॉकर रूमचा दरवाजा जनतेला दिसणार नाही अशा तºहेने झाकलेला असावा.
लॉकर रूममध्ये बँक अधिकारी व ग्राहक अशा दोनच व्यक्ती एकावेळी उपस्थित असाव्यात.
लॉकर दोन चाव्यांनी उघडणारे असावे. यापैकी एक चावी ग्राहकाकडे व दुसरी बँकेकडे असावी.
संपूर्ण लॉकर रूममध्ये अलार्म सिस्टिम असणे व तिचा आवाज १ कि.मी.पर्यंत ऐकू येणे आवश्यक आहे.
लॉकर रूम असणाºया इमारतीत आत व बाहेर सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे.
संपूर्ण इमारतीसमोर सशस्त्र सुरक्षा
रक्षक २४ तास असणे आवश्यक.
लॉकरचा आकार
अ श्रेणीसाठी ४.५ इंच, ५.७५ इंच, २०.७५
इंच, तर छ/ङ श्रेणीसाठी १५.५ इंच, १९.७५ इंच, २०.७५ इंच असावा.
लॉकर रूम वेगळी
असेल तर तळ व बाजूच्या भिंती व दरवाजा १८ मिमी लोखंडी प्लेटचा असणे आवश्यक.
> कडक नियम का?
इंडियन कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅक्टच्या कलम १५२ प्रमाणे लॉकरच्या बाबतीत बँक/ लॉकर कंपनी व ग्राहक यांचे नाते घरमालक व भाडेकरूचे निश्चित केले आहे. त्यामुळे लॉकर फोडून चोरी झाली तरी ग्राहकाच्या नुकसानीसाठी बँक/लॉकर कंपनी जबाबदार नसते.
म्हणून चोरी होऊच नये म्हणून एवढे कडक सुरक्षा नियम रिझर्व्ह बँकेने घालून दिले आहेत, अशी माहिती वर्धमान नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व चार्टर्ड अकाउंटंट अनिल पारख यांनी दिली.
>लॉकरधारकांनी काय करावे? : लॉकरधारकांनी आपल्या पतसंस्थेने/बँकेने अथवा लॉकर कंपनीने हे नियम पाळले आहेत की नाही याची त्वरित शहानिशा करावी व उचित निर्णय घ्यावा, असे आवाहन सहकारी बँकांचे कन्सल्टंट दिलीप मुलमुले यांनी केले.

Web Title: Know the Reserve Bank's rules about 'Vault'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक