Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयआयटी खरगपूरच्या सर्वांना नोकरी, बिझनेस स्कूलचे विद्यार्थी; बड्या कंपन्या कॅम्पसमध्ये

आयआयटी खरगपूरच्या सर्वांना नोकरी, बिझनेस स्कूलचे विद्यार्थी; बड्या कंपन्या कॅम्पसमध्ये

इंडीयन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) खरगपूरच्या बिझनेस मॅनेजमेंटची शाखा विनोद गुप्ता स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षाच्या (२०१७-२०१८) १११ विद्यार्थ्यांच्या तुकडीने प्लेसमेंटच्या एकूण ११२ आॅफर्स मिळवल्या आहेत. २३ या प्री-प्लेसमेंटच्या आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:47 PM2018-01-09T23:47:30+5:302018-01-09T23:47:36+5:30

इंडीयन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) खरगपूरच्या बिझनेस मॅनेजमेंटची शाखा विनोद गुप्ता स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षाच्या (२०१७-२०१८) १११ विद्यार्थ्यांच्या तुकडीने प्लेसमेंटच्या एकूण ११२ आॅफर्स मिळवल्या आहेत. २३ या प्री-प्लेसमेंटच्या आहेत.

Jobs at IIT Kharagpur, Business School students; Big companies in campus | आयआयटी खरगपूरच्या सर्वांना नोकरी, बिझनेस स्कूलचे विद्यार्थी; बड्या कंपन्या कॅम्पसमध्ये

आयआयटी खरगपूरच्या सर्वांना नोकरी, बिझनेस स्कूलचे विद्यार्थी; बड्या कंपन्या कॅम्पसमध्ये

कोलकाता : इंडीयन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) खरगपूरच्या बिझनेस मॅनेजमेंटची शाखा विनोद गुप्ता स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षाच्या (२०१७-२०१८) १११ विद्यार्थ्यांच्या तुकडीने प्लेसमेंटच्या एकूण ११२ आॅफर्स मिळवल्या आहेत. २३ या प्री-प्लेसमेंटच्या आहेत.
४१ कंपन्यांनी आयआयटी-खरगपूर कॅम्पसला भेट दिली. त्यात अ‍ॅक्सेंचर डिजिटल, अमॅझॉन, क्रिसिल, डेलाईट्टे, एचएसबीसी, आयबीएम, जेपी मॉर्गन चेस, मे बँक, नोमुरा, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्वेस्ट ग्लोबल, स्पेनर्स रिटेल, टायटन, वेदांत आणि विप्रो यांचा समावेश होता. आयआयटी -खरगपूरला प्रथमच भेट देणाºया कंपन्यांत अ‍ॅझूर पॉवर, कॅपिल्लरी टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, जनरल मिल्स, एचडीएफसी लाईफ, नोव्हार्टीस आणि व्हॅल्यू -लॅब्ज यांचा समावेश आहे. यावर्षी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय आॅफर सीटीसीची वार्षिक २७ लाख रुपयांची तर देशात सर्वात जास्त वार्षिक २० लाख रुपयांची सीटीसीचीच आहे. बहुतेक नोकºया या कन्सल्टिंग क्षेत्रातील असून त्यानंतर अ‍ॅनालिटिक्स, सर्वसाधारण व्यवस्थापन आणि आॅपरेशन्सच्या आहेत. अनेक नामवंत कंपन्या येत्या काही दिवसांत कॅम्पसला भेट देण्याच्या तयारीत असल्यामुळे नोकºया मिळण्याची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे, असे विनोद गुप्ता स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या अधिष्ठाता प्रबिना राजीब यांनी सांगितले. प्लेसमेंटचा हा शेवटचा टप्पा होता. अ‍ॅझूर पॉवर, कॅपिल्लरी टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, जनरल मिल्स, एचडीएफसी लाईफ, नोव्हार्टीस आणि व्हॅल्यू लॅब्ज या कंपन्या कॅम्पससाठी पहिल्यांदाच आल्या त्या एमबीए विद्यार्थ्यांची भरती करण्यासाठी, असे प्रबिना राजीब म्हणाल्या. (वृत्तसंस्था)

चांगल्या आॅफर्स आल्या
प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या मोठ्या २५ टक्के आॅफर्स वार्षिक सरासरी १७.४० लाखाच्या तर पहिल्या ५० आॅफर्स या वार्षिक १५.४० लाखांच्या आहेत. विनोद गुप्ता स्कूल आॅफ मॅनेजमेंट ही देशातील नामंकित संस्था असून येथून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना मोठी प्रतिष्ठा लाभते त्यामुळे संस्थेचे प्लेसमेंट रेकॉर्डही चांगले आहे.

Web Title: Jobs at IIT Kharagpur, Business School students; Big companies in campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी