Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांना नको शेअर्स संबंधित गुंतवणूक, इक्विटी लिंक गुंतवणूक ३.४ टक्केच

गुंतवणूकदारांना नको शेअर्स संबंधित गुंतवणूक, इक्विटी लिंक गुंतवणूक ३.४ टक्केच

थेट शेअर बाजारात गुंतवणूक न करताही अधिक परतावा मिळण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. मात्र, त्यातही शेअर्सशी संबंधित गुंतवणुकीपासून गुंतवणूकदार स्वत:ला दूर ठेवत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:17 AM2018-01-13T02:17:44+5:302018-01-13T02:17:49+5:30

थेट शेअर बाजारात गुंतवणूक न करताही अधिक परतावा मिळण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. मात्र, त्यातही शेअर्सशी संबंधित गुंतवणुकीपासून गुंतवणूकदार स्वत:ला दूर ठेवत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

Investors want to invest in shares related to equity, equity linked investment 3.4 percent | गुंतवणूकदारांना नको शेअर्स संबंधित गुंतवणूक, इक्विटी लिंक गुंतवणूक ३.४ टक्केच

गुंतवणूकदारांना नको शेअर्स संबंधित गुंतवणूक, इक्विटी लिंक गुंतवणूक ३.४ टक्केच

मुंबई : थेट शेअर बाजारात गुंतवणूक न करताही अधिक परतावा मिळण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. मात्र, त्यातही शेअर्सशी संबंधित गुंतवणुकीपासून गुंतवणूकदार स्वत:ला दूर ठेवत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांचा पैसा तो फंड व्यवस्थापक विविध क्षेत्रांतील विविध कंपन्यांमध्ये गुंतवतो. त्यात अनेक पर्यायांचा समावेश असतो. यापैकीच एक प्रकारची गुंतवणूक ही ‘इक्विटी लिंक’ अर्थात, थेट शेअर बाजारातील असते. शेअर बाजारातील संबंधित कंपनीत ही गुंतवणूक केली जाते.
त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत
कमी-अधिक झाली की, त्याचा परिणाम म्युच्युअल फंडातील या परताव्यावर होत असतो. मात्र, भारतात म्युच्युअल फंड येऊन २० वर्षे लोटल्यावरही गुंतवणूकदार अशा ‘इक्विटी लिंक’ बचत सेवांपासून दूरच असल्याचे भारतीय म्युच्युअल फंड असोसिएशनच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार, देशातील म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक ३१ डिसेंबरअखेर २२ लाख ३६ हजार ८३६ कोटी रुपये आहे.

जागरूकतेचा अभाव
म्युच्युअल फंड हा कमी जोखमीत अधिक परतावा
देणारा गुंतवणुकीचा सर्वात सोपा मार्ग आहे. मात्र, ग्राहकांमध्ये जागृतीचा अभाव असल्यानेच ते याकडे येत नाहीत. त्यातूनच ते स्वत:ला ‘इक्विटी लिंक’ बचत सेवांपासून दूर ठेवतात. या गैरसमजातून गुंतवणूकदारांनी बाहेर यावे, असे मत एक्सिस बँकेचे उपाध्यक्ष रोहन पाध्ये
यांनी व्यक्त केले.

Web Title: Investors want to invest in shares related to equity, equity linked investment 3.4 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.