Interim Budget 2019 : A bonus of 7 thousand for workers in unorganized sector having salary up to 21 thousand rupees | Budget 2019: कामगारांचा विजय असो... 21 हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्यांना 7 हजाराचा बोनस
Budget 2019: कामगारांचा विजय असो... 21 हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्यांना 7 हजाराचा बोनस

ठळक मुद्देकेंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी नोकरदारांसाठी मोठी घोषणा केली 21 हजार पगार असलेल्यांना 7 हजार बोनस देण्यात येणार आहे.असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार 

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी नोकरदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. 21 हजार पगार असलेल्यांना 7 हजार बोनस देण्यात येणार आहे. ईपीएफओच्या माध्यमातून हा 7 हजार बोनस मिळणार असल्याचंही गोयल यांनी जाहीर केलं आहे. प्रतिमहिना 15 हजार रुपयांहून अधिक पैसे कमावणाऱ्या मजुरांना श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मजुरांच्या मृत्यूनंतर 6 लाखांची नुकसानभरपाईसुद्धा देण्यात येणार आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत सादर केला. यावेळी मोदी सरकारने शेतकरांना मोठी भेट दिली आहे. प्रधानमंत्री किसान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले. 


केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

 • असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार 
 • 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
 • पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत 
 • किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी 
 • सरकार कामधेनू योजना सुरू करणार 
 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार 
 • दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार 
 • गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ
 • यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला
 • आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत
 • एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं
 • कमरतोड महंगाई की कमर तोड दी


   

Web Title: Interim Budget 2019 : A bonus of 7 thousand for workers in unorganized sector having salary up to 21 thousand rupees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.