Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर : यंदा देशात वाढणार नोकरभरती

खूशखबर : यंदा देशात वाढणार नोकरभरती

यंदा रोजगार बाजार तेजीत राहणार असून, कंपन्यांकडून नोकरभरतीत वाढ केली जाणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना मिळणा-या लाभांतही (कॉम्पेन्सेशन) वाढ होणार आहे. ‘विसडम जॉब्ज डॉट कॉम’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:11 AM2018-03-17T01:11:36+5:302018-03-17T01:11:36+5:30

यंदा रोजगार बाजार तेजीत राहणार असून, कंपन्यांकडून नोकरभरतीत वाढ केली जाणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना मिळणा-या लाभांतही (कॉम्पेन्सेशन) वाढ होणार आहे. ‘विसडम जॉब्ज डॉट कॉम’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

Interestingly: This year, the recruitment of the recruitment staff will increase in the country | खूशखबर : यंदा देशात वाढणार नोकरभरती

खूशखबर : यंदा देशात वाढणार नोकरभरती

नवी दिल्ली : यंदा रोजगार बाजार तेजीत राहणार असून, कंपन्यांकडून नोकरभरतीत वाढ केली जाणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना मिळणा-या लाभांतही (कॉम्पेन्सेशन) वाढ होणार आहे. ‘विसडम जॉब्ज डॉट कॉम’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६0 टक्के कंपन्यांनी नोकरभरती वाढणार असल्याचे मत व्यक्त केले. ‘विसडम’ने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, नोटाबंदी, एच १ बी व्हिसाचे कठोर नियम आणि जीएसटी यामुळे झालेल्या प्रतिकूल परिणामांतून औद्योगिक क्षेत्र आता सावरले आहे. त्यामुळे रोजगाराच्या बाबतीत आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
अहवालात म्हटले आहे की, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५४ टक्के कंपन्यांनी कर्मचाºयांना मिळणारे लाभ ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता असल्याचे नमूद केले. ३९ टक्के कंपन्यांनी लाभ वाढतील, असे म्हटले, तसेच ५ टक्के उत्तरदात्यांनी लाभ घटतील, असे म्हटले.
कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीतील कर्मचाºयांच्या लाभात वाढ होईल, असे मत ६0 टक्के कंपन्यांनी
व्यक्त केले.
>आधुनिक तंत्रज्ञानामुळे नव्या संधी
‘विसडम जॉब्ज डॉट कॉम’चे संस्थापक व सीईओ अजय कोल्ला यांनी सांगितले की, यंदा आयटी, तंत्रज्ञान क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रवेश होत असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. वस्तू उत्पादन, आयटी, वाहतूक आणि अतिथ्य या क्षेत्रात २0१७ मध्ये नोकºया कमी झाल्याचे दिसून आले होते. या क्षेत्रांतही यंदा काही सुधारणा दिसून येईल.

Web Title: Interestingly: This year, the recruitment of the recruitment staff will increase in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.