ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 9:50pm

वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले, आता 178 वस्तूंना आम्ही 28 टक्के टॅक्स स्लॅबमधून हटवून 18 टक्केच्या स्लॅबमध्ये आणल्या आहेत. मात्र आलिशान सामान, सीमेंट आणि रंग यांना या स्लॅबमधून बाहेर काढलेले नाही.

गुवाहाटी - जीएसटी कौन्सिलच्या 23 व्या बैठकीत सर्वसामान्य ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आहेत. चॉकलेटपासून डिटर्जंटपर्यंत सुमारे 178 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के झाला आहे. त्याशिवाय 18, 12 आणि 5 टक्के जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याबरोबरच रेस्टॉरंटमधील खाण्यावरही  आता केवळ 5 टक्के जीएसटी लागेल, अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.  वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले,"गेल्या तीन बैठकांमध्ये आम्ही 28 टक्के टॅक्स स्लॅबचे निरीक्षण करत होते. त्यातील काही वस्तूंना आम्ही 28 टक्क्यांच्या स्लॅबमधून बाहेर काढले होते. आता 178 वस्तूंना आम्ही 28 टक्के टॅक्स स्लॅबमधून हटवून 18 टक्केच्या स्लॅबमध्ये आणल्या आहेत. मात्र आलिशान सामान, सीमेंट आणि रंग यांना या स्लॅबमधून बाहेर काढलेले नाही. आता केवळ 50 वस्तूंवरच 28 टक्क्यांहून अधिक कर आहे." या बदलांबाबत केंद्र आणि राज्य सरकारला नोटिफिकेशन प्रसिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे हे बदल 15 नोव्हेंबरपासून लागू होतील, अशी माहितीही जेटली यांनी दिली. त्याबरोबरच कंपोझिशन स्कीम एक कोटींवरून दीड कोटींपर्यंत देण्यात आली आहे. तसेच फॉर्म 3 भरण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.    जीएसटी परिषदेने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार  हॉटेलमध्ये खानपान आता आणखी स्वस्त झाले आहे. यापुढे हॉटेलमधल्या बिलावर फक्त पाच टक्के जीएसटी आकारण्यात येईल. हॉटेल एसी असो वा नॉन एसी फक्त पाच टक्केच जीएसटी आकारण्यात येईल. यापूर्वी नॉन एसी हॉटेलमध्ये 12 टक्के आणि एसी हॉटेलमध्ये 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. एखाद्या हॉटेलमध्ये एसी आणि नॉन एसी अशी व्यवस्था असताना तुम्ही नॉन एसीमध्ये काही खाल्ल तरी 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. ज्या हॉटेल्समध्ये रुमचे भाडे 7500 रुपयांपेक्षा जास्त आहे त्या हॉटेल्समध्ये 18 टक्केच जीएसटी आकारण्यात येईल.  आसामच्या गुवहाटी येथे सुरु असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटीमध्ये बदल करण्याचा  निर्णय घेण्यात आला.  विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर  28 टक्के जीएसटी आकारण्याला मोठा विरोध होता. त्यामुळे फक्त आलिशान, चैनींच्या 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.  1 जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टॅक्स स्लॅब जीएसटीमध्ये आहेत. जुलै महिन्यात हा कर लागू झाल्यानंतर 227 वस्तू 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आहेत. ग्रेनाईट, दाढीचे सामान, सौंदर्य प्रसाधन, मार्बल, चॉकलेट, च्युविंग गम, शेव्हींग क्रिम आणखी स्वस्त होणार आहे.

संबंधित

हॉटेलमध्ये खानपान झाले स्वस्त, फक्त 5 टक्के लागणार जीएसटी
जीएसटीमध्ये मोठी कपात, रोजच्या वापरातल्या 177 वस्तू झाल्या स्वस्त
GST भल्या भल्यांना कळलेला नाही - भाजपा मंत्र्याचा घरचा आहेर

व्यापार कडून आणखी

पन्नास विदेशी गुंतवणूक करार रद्द
बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दणका? सरकारने पाठवली नोटीस 
हस्तकलेसह २९ वस्तूंवर शून्य कर; ५४ प्रकारच्या सेवाही झाल्या स्वस्त, जीएसटी परिषदेचा निर्णय
परवडणा-या घरांच्या प्रकल्पांसाठी एसबीआय उभारणार २0 हजार कोटी
गोवा सरकारच्या ‘कॅसिनो’ महसुलात घट , जीएसटी कायद्यानंतर बसला फटका

आणखी वाचा