lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती 

ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती 

वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले, आता 178 वस्तूंना आम्ही 28 टक्के टॅक्स स्लॅबमधून हटवून 18 टक्केच्या स्लॅबमध्ये आणल्या आहेत. मात्र आलिशान सामान, सीमेंट आणि रंग यांना या स्लॅबमधून बाहेर काढलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 09:50 PM2017-11-10T21:50:46+5:302017-11-10T21:56:12+5:30

वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले, आता 178 वस्तूंना आम्ही 28 टक्के टॅक्स स्लॅबमधून हटवून 18 टक्केच्या स्लॅबमध्ये आणल्या आहेत. मात्र आलिशान सामान, सीमेंट आणि रंग यांना या स्लॅबमधून बाहेर काढलेले नाही.

Information about finance minister Arun Jaitley, a major relief to consumers and small traders | ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती 

ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती 

गुवाहाटी - जीएसटी कौन्सिलच्या 23 व्या बैठकीत सर्वसामान्य ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आहेत. चॉकलेटपासून डिटर्जंटपर्यंत सुमारे 178 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के झाला आहे. त्याशिवाय 18, 12 आणि 5 टक्के जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याबरोबरच रेस्टॉरंटमधील खाण्यावरही  आता केवळ 5 टक्के जीएसटी लागेल, अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. 
वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले,"गेल्या तीन बैठकांमध्ये आम्ही 28 टक्के टॅक्स स्लॅबचे निरीक्षण करत होते. त्यातील काही वस्तूंना आम्ही 28 टक्क्यांच्या स्लॅबमधून बाहेर काढले होते. आता 178 वस्तूंना आम्ही 28 टक्के टॅक्स स्लॅबमधून हटवून 18 टक्केच्या स्लॅबमध्ये आणल्या आहेत. मात्र आलिशान सामान, सीमेंट आणि रंग यांना या स्लॅबमधून बाहेर काढलेले नाही. आता केवळ 50 वस्तूंवरच 28 टक्क्यांहून अधिक कर आहे." या बदलांबाबत केंद्र आणि राज्य सरकारला नोटिफिकेशन प्रसिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे हे बदल 15 नोव्हेंबरपासून लागू होतील, अशी माहितीही जेटली यांनी दिली. त्याबरोबरच कंपोझिशन स्कीम एक कोटींवरून दीड कोटींपर्यंत देण्यात आली आहे. तसेच फॉर्म 3 भरण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.   
जीएसटी परिषदेने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार  हॉटेलमध्ये खानपान आता आणखी स्वस्त झाले आहे. यापुढे हॉटेलमधल्या बिलावर फक्त पाच टक्के जीएसटी आकारण्यात येईल. हॉटेल एसी असो वा नॉन एसी फक्त पाच टक्केच जीएसटी आकारण्यात येईल. यापूर्वी नॉन एसी हॉटेलमध्ये 12 टक्के आणि एसी हॉटेलमध्ये 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. एखाद्या हॉटेलमध्ये एसी आणि नॉन एसी अशी व्यवस्था असताना तुम्ही नॉन एसीमध्ये काही खाल्ल तरी 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. ज्या हॉटेल्समध्ये रुमचे भाडे 7500 रुपयांपेक्षा जास्त आहे त्या हॉटेल्समध्ये 18 टक्केच जीएसटी आकारण्यात येईल. 
आसामच्या गुवहाटी येथे सुरु असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटीमध्ये बदल करण्याचा  निर्णय घेण्यात आला.  विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर  28 टक्के जीएसटी आकारण्याला मोठा विरोध होता. त्यामुळे फक्त आलिशान, चैनींच्या 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. 
1 जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टॅक्स स्लॅब जीएसटीमध्ये आहेत. जुलै महिन्यात हा कर लागू झाल्यानंतर 227 वस्तू 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आहेत. ग्रेनाईट, दाढीचे सामान, सौंदर्य प्रसाधन, मार्बल, चॉकलेट, च्युविंग गम, शेव्हींग क्रिम आणखी स्वस्त होणार आहे.

Web Title: Information about finance minister Arun Jaitley, a major relief to consumers and small traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.