lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईमुळे पुन्हा वाढतील व्याजदर, कर्जेही महागणार

महागाईमुळे पुन्हा वाढतील व्याजदर, कर्जेही महागणार

महागाईच्या दराने मे महिन्यात ४.८७ टक्क्यांची पातळी गाठली. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही अधिक राहिला असून, त्यामुळे रेपो दरात आणखी वाढ होऊ शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:52 AM2018-06-14T00:52:07+5:302018-06-14T00:52:07+5:30

महागाईच्या दराने मे महिन्यात ४.८७ टक्क्यांची पातळी गाठली. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही अधिक राहिला असून, त्यामुळे रेपो दरात आणखी वाढ होऊ शकते.

Inflation will rise again, interest rates will also rise | महागाईमुळे पुन्हा वाढतील व्याजदर, कर्जेही महागणार

महागाईमुळे पुन्हा वाढतील व्याजदर, कर्जेही महागणार

मुंबई - महागाईच्या दराने मे महिन्यात ४.८७ टक्क्यांची पातळी गाठली. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही अधिक राहिला असून, त्यामुळे रेपो दरात आणखी वाढ होऊ शकते.
गेल्या आठवड्यात पतधोरण आढावा घेताना बँकेने रेपो दरात (बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा दर) पाव टक्का वाढ केली. यामुळे कर्जे महाग झाली. सप्टेंबर महिन्यापर्यंत महागाई ४.७ टक्के राहणार असल्यानेच बँकेने हा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात मात्र मेमध्येच महागाई दर त्याहून अधिक होता.
आता पुढील पतधोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँक रेपो दरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. ही बैठक ३१ जुलै व १ आॅगस्टला होत आहे.

खनिज दर स्थिरच

आंतरराष्टÑीय बाजारात खनिज तेलाचे दर कमी होण्याची शक्यता नाही. सप्टेंबरपर्यंत खनिज तेलाचे दर ७८ डॉलर प्रति बॅरलदरम्यान राहतील, असा अंदाज होता. मात्र सध्या खनिज तेलाचे दर ७५ ते
७६ डॉलरदरम्यान असून, सप्टेंबरपर्यंत ते ८०च्याही वर जाऊ शकतात. रुपयासुद्धा सातत्याने डॉलरसमोर कमकुवत होत आहे. यामुळेच महागाई वाढेल, असे तज्ज्ञांना वाटते.

Web Title: Inflation will rise again, interest rates will also rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.