Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाई दर १२ महिन्यांच्या नीचांकावर! इंधन स्वस्ताईचा परिणाम होण्याची शक्यता

महागाई दर १२ महिन्यांच्या नीचांकावर! इंधन स्वस्ताईचा परिणाम होण्याची शक्यता

आॅक्टोबर महिन्यातील महागाई दर ३.६७ टक्क्यांसह १२ महिन्यांच्या नीचांकावर राहण्याचा अंदाज ‘रॉयटर्स’ने व्यक्त केला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही कमी असेल, असे अभ्यासात समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 05:03 AM2018-11-10T05:03:32+5:302018-11-10T05:04:02+5:30

आॅक्टोबर महिन्यातील महागाई दर ३.६७ टक्क्यांसह १२ महिन्यांच्या नीचांकावर राहण्याचा अंदाज ‘रॉयटर्स’ने व्यक्त केला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही कमी असेल, असे अभ्यासात समोर आले आहे.

Inflation falls to 12-month low, The possibility of the effect of fuel economy | महागाई दर १२ महिन्यांच्या नीचांकावर! इंधन स्वस्ताईचा परिणाम होण्याची शक्यता

महागाई दर १२ महिन्यांच्या नीचांकावर! इंधन स्वस्ताईचा परिणाम होण्याची शक्यता

मुंबई - आॅक्टोबर महिन्यातील महागाई दर ३.६७ टक्क्यांसह १२ महिन्यांच्या नीचांकावर राहण्याचा अंदाज ‘रॉयटर्स’ने व्यक्त केला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही कमी असेल, असे अभ्यासात समोर आले आहे.

इंधनाचे वाढते दर व घसरणारा रुपया यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या अर्ध वर्षात (आॅक्टोबर २०१८ ते मार्च २०१९) महागाई दर ४ टक्के अथवा त्याहून अधिक असेल, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र सप्टेंबर महिन्यात महागाई दर ३.७७ टक्के राहीला. आता आॅक्टोबर महिन्यात महागाई दर ३.६७ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज या अभ्यासात मांडण्यात आला आहे. देशभरातील ३५ प्रमुख अर्थतज्ज्ञांनी या अभ्यास अहवालात यासंबंधी मत मांडले आहे.

आॅक्टोबर महिन्यात रुपया डॉलरसमोर किंचीत वधारला. त्यामुळे इंधनाच्या दरांमध्ये घट झाली. त्यातून धान्य तसे दैनंदिन गरजेचा भाजीपालासुद्धा स्वस्त होऊ लागला आहे. यामुळेच महागाई दर कमी होण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी मांडला आहे. आॅक्टोबरमध्येही महागाई दर ४ टक्क्यांपेक्षा कमी राहील्यास, रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा सलग तिसºया महिन्यात महागाई दरात घट असेल.

कच्चे तेल ७ रुपयांनी स्वस्त

आंतरराष्ट्रीय  बाजारात फेब्रुवारी महिन्यात ६३ डॉलर प्रति बॅरल (११९ लिटर) असलेले कच्चे तेल आॅक्टोबरपर्यंत ८६ डॉलरवर पोहोचले. आता ते ७० डॉलरवर आले आहे. त्याचवेळी डॉलरसमोर रुपयासुद्धा मजबूत झाला आहे. सध्या डॉलरचा दर ७२.४० रुपये आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ७ रुपये प्रति लिटर स्वस्त झाले आहे. या सर्वांचा परिणाम देशांतर्गत इंधनावर होऊन महागाई दरात घट होण्याची शक्यता आहे, असे मत स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनीही व्यक्त केले आहे. १८ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबरदरम्यान पेट्रोल ४.४४ व डिझेल २.९१ रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले. यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पेट्रोल ८४ व डिझेल ७५ रुपये प्रति लिटरच्या खाली गेले आहे.

Web Title: Inflation falls to 12-month low, The possibility of the effect of fuel economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.