Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘रेडी टू ईट‘साठी उद्योगांनी तयार राहावे, केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांचं प्रतिपादन

‘रेडी टू ईट‘साठी उद्योगांनी तयार राहावे, केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांचं प्रतिपादन

अन्नधान्य प्रक्रिया उद्योग झपाट्याने वाढतो आहे. जागतिक बाजारात टिकून राहायचे असेल तर भारतातील या उद्योगाने नवीन तंत्रज्ञान अवगत करून घेणे गरजेचे आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:24 AM2017-09-19T01:24:11+5:302017-09-19T01:24:14+5:30

अन्नधान्य प्रक्रिया उद्योग झपाट्याने वाढतो आहे. जागतिक बाजारात टिकून राहायचे असेल तर भारतातील या उद्योगाने नवीन तंत्रज्ञान अवगत करून घेणे गरजेचे आहे.

Industry should be ready for 'Ready to Eat', the presentation of Union Food Processing Industries Minister Harsimrat Kaur Badal | ‘रेडी टू ईट‘साठी उद्योगांनी तयार राहावे, केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांचं प्रतिपादन

‘रेडी टू ईट‘साठी उद्योगांनी तयार राहावे, केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांचं प्रतिपादन

मुंबई : अन्नधान्य प्रक्रिया उद्योग झपाट्याने वाढतो आहे. जागतिक बाजारात टिकून राहायचे असेल तर भारतातील या उद्योगाने नवीन तंत्रज्ञान अवगत करून घेणे गरजेचे आहे. शिवाय ‘रेडी टू ईट’ पदार्थांसाठीही प्रक्रिया उद्योगांनी तयार राहावे, असे प्रतिपादन केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मुंबईत झालेल्या अन्नपूर्णा-वर्ल्ड आॅफ फूड इंडिया एक्स्पोमध्ये केले.
तीन दिवस झालेल्या या एक्स्पोमध्ये १८ देशांतील २५० हून अधिक उद्योजक सहभागी झाले होते. कोएल्नमेस् वायए ट्रेड फेअर प्रायव्हेट लिमिटेड आणि फिक्की यांनी या एक्स्पोचे आयोजन केले होते. बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या या एक्स्पोमध्ये विविध प्रकारची उत्पादने आणि तंत्रज्ञान मांडण्यात आले. शिवाय ब्रेड आणि बेक केलेले पदार्थ, कॉन्सर्व्ह, मसाले, फाइन/ हेल्थ/ बेबी फूड, अन्नात घातले जाणारे इतर घटक आदींचेही प्रदर्शन मांडले होते.

Web Title: Industry should be ready for 'Ready to Eat', the presentation of Union Food Processing Industries Minister Harsimrat Kaur Badal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.