Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीयांची नोकरीसाठी मायदेशी धाव, नागरिक मोठ्या प्रमाणात परतू लागले भारतात

भारतीयांची नोकरीसाठी मायदेशी धाव, नागरिक मोठ्या प्रमाणात परतू लागले भारतात

नवी दिल्ली : नोक-यांसाठी विदेशात गेलेले भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात भारतात परतू लागले आहेत. अमेरिका, ब्रिटन, आखाती देश तसेच सिंगापूर आणि हाँगकाँग येथील भारतीयांनी भारतात नोकºया शोधण्यासाठी भरती संस्थांकडे नावनोंदणी केल्याचे समोर आले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 04:01 AM2017-10-24T04:01:33+5:302017-10-24T04:01:58+5:30

नवी दिल्ली : नोक-यांसाठी विदेशात गेलेले भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात भारतात परतू लागले आहेत. अमेरिका, ब्रिटन, आखाती देश तसेच सिंगापूर आणि हाँगकाँग येथील भारतीयांनी भारतात नोकºया शोधण्यासाठी भरती संस्थांकडे नावनोंदणी केल्याचे समोर आले.

India's move to work for Indian job | भारतीयांची नोकरीसाठी मायदेशी धाव, नागरिक मोठ्या प्रमाणात परतू लागले भारतात

भारतीयांची नोकरीसाठी मायदेशी धाव, नागरिक मोठ्या प्रमाणात परतू लागले भारतात

नवी दिल्ली : नोक-यांसाठी विदेशात गेलेले भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात भारतात परतू लागले आहेत. अमेरिका, ब्रिटन, आखाती देश तसेच सिंगापूर आणि हाँगकाँग येथील भारतीयांनी भारतात नोक-या शोधण्यासाठी भरती संस्थांकडे नावनोंदणी केल्याचे समोर आले.
विविध देशांकडून राबविण्यात येत असलेली धोरणे, नोकरी जाण्याची भीती आणि स्थानिक राजकारण यामुळे भारतीय नागरिक मायदेशी परतत आहेत. अमेरिका व युरोपच्या निवडणुकांत स्थलांतरित कामगारांविरोधात कल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतीय लोक मायदेशी परतण्यास प्राधान्य देत आहेत. त्यांना भारतातील आयटी, तंत्रज्ञान, आरोग्य व औषधी इत्यादी क्षेत्रात चांगल्या संधीही आहेत. संशोधन आणि विकास क्षेत्रातही चांगल्या संधी आहेत.
टीम-लीज सर्व्हिसेसचे सहसंस्थापक रितूपर्ण चक्रवर्ती यांनी सांगितले की, भारतात औषधी, वस्तू उत्पादन, वाहन आणि आरोग्य या क्षेत्रातील कंपन्या संशोधन आणि विकासाकडे (आर अ‍ॅण्ड डी) अधिक लक्ष देत आहेत. अनेक कंपन्या तर ‘आर अ‍ॅण्ड डी’ची सर्व प्रकारची कामे पूर्णत: भारतातच स्थलांतरित करीत आहेत. त्यामुळे अनेक भारतीय मायदेशात परतून या प्रकल्पांचे नेतृत्व करण्याची संधी शोधत आहेत.
>चांगल्या संधी
बीटीआय कन्सल्टंट्सचे व्यवस्थापकीय संचालक जेम्स अग्रवाल यांनी सांगितले की, अमेरिका आणि ब्रिटनसारखे देश स्थानिकांना नोकºया देण्यास प्राधान्य देत आहेत. त्याच वेळी भारतात नव्या तंत्रज्ञानासाठी दारे उघडली जात आहेत. डाटा सायन्सेस, मशीन लर्निंग, अ‍ॅनॅलिटिक्स आणि क्लाउड कॉम्युटिंग या नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतात चांगल्या संधी निर्माण होत आहेत.

Web Title: India's move to work for Indian job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत