Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताचा विकास दर ७.३ टक्क्यांवर जाईल - जागतिक बँक; अर्थव्यवस्थेत प्रचंड क्षमता

भारताचा विकास दर ७.३ टक्क्यांवर जाईल - जागतिक बँक; अर्थव्यवस्थेत प्रचंड क्षमता

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर (जीडीपी) २०१८ मध्ये ७.३ टक्के असेल. तर पुढील दोन वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांनी पुढे जाईल, असा विश्वास जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:27 AM2018-01-11T01:27:47+5:302018-01-11T01:27:58+5:30

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर (जीडीपी) २०१८ मध्ये ७.३ टक्के असेल. तर पुढील दोन वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांनी पुढे जाईल, असा विश्वास जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

India's growth rate will go up to 7.3% - World Bank; Heavy capacity in the economy | भारताचा विकास दर ७.३ टक्क्यांवर जाईल - जागतिक बँक; अर्थव्यवस्थेत प्रचंड क्षमता

भारताचा विकास दर ७.३ टक्क्यांवर जाईल - जागतिक बँक; अर्थव्यवस्थेत प्रचंड क्षमता

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर (जीडीपी) २०१८ मध्ये ७.३ टक्के असेल. तर पुढील दोन वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांनी पुढे जाईल, असा विश्वास जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.
केंद्रीय सांख्यिकी विभागाने दोनच दिवसांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.७ टक्क्यांसह घसरणीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सध्या होणाºया सर्वसमावेशक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात जलद गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विकास दरावर होईल, असे जागतिक बँकेचे मत आहे.
बँकेच्या अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने विकसित होईल. चीनी अर्थव्यवस्थेचा वेग मात्र कमी असेल. २०१७ मध्ये चीनी अर्थव्यवस्था भारतापेक्षा ०.१ टक्का अधिक ६.८ टक्क्यांनी विकसित झाली. २०१८ मध्ये मात्र भारतीय अर्थव्यवस्था ७.३ आणि ७.५ टक्क्यांनी पुढे जात असताना चीनी अर्थव्यवस्थेचा वेग ६.४, ६.३ आणि ६.२ टक्के असा कमी होत जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.

निवडणुकांमुळे अडथळे
आंतरराष्टÑीय मानांकन संस्था मुडीज्ने मात्र भारतात निवडणुकांमुळे २०१८ आणि २०१९ मध्ये आर्थिक सुधारणांमध्ये अडथळा येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली. मात्र २०१८ च्या मध्यानंतर या सर्व सुधारणा हळुवार होतील. त्याचा एकूणच अर्थव्यवस्थेतील पत उपलब्धतेवर परिणाम होईल, असे मुडीज्ने आशिया-पॅसिफिक संबंधी अहवालात नमूद केले आहे.

सुधारणांचा परिणाम
‘जीएसटी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा टर्निंग पॉइंट होता. यासोबतच सध्या सुरू असलेल्या अन्य सुधारणा या भारतासाठी आश्वासक ठरताहेत. ७ टक्के विकास दर ही भारतीय अर्थव्यवस्थेची मूळ क्षमता आहे. त्याला सुधारणांचे इंजिन लागल्याने अर्थव्यवस्था गतीमान होत आहे. आम्ही पुढील दहा वर्षांचा विचार करतो. त्यानुसार भारतात प्रचंड क्षमता तयार होत आहे.’
- अह्यान कोस, जागतिक बँकेचे संचालक व अहवालाचे लेखक

Web Title: India's growth rate will go up to 7.3% - World Bank; Heavy capacity in the economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.