Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! पोस्टानं सुरू केली जबरदस्त सुविधा, 17 कोटी ग्राहकांना होणार फायदा

खूशखबर! पोस्टानं सुरू केली जबरदस्त सुविधा, 17 कोटी ग्राहकांना होणार फायदा

भारतीय पोस्ट ऑफिसनं आता आपल्याला बँकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 09:54 AM2018-12-15T09:54:02+5:302018-12-15T10:03:39+5:30

भारतीय पोस्ट ऑफिसनं आता आपल्याला बँकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे.

india post starts internet banking facility for its savings account customers | खूशखबर! पोस्टानं सुरू केली जबरदस्त सुविधा, 17 कोटी ग्राहकांना होणार फायदा

खूशखबर! पोस्टानं सुरू केली जबरदस्त सुविधा, 17 कोटी ग्राहकांना होणार फायदा

Highlights भारतीय पोस्ट ऑफिसनं आता आपल्याला बँकिंग सेवाही उपलब्ध करून दिलीआता आपण आरडी, पीएफ योजनेशी संबंधित कामं घरी बसून करू शकता. 17 कोटी पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांना ऑनलाइन पैसे वळते करण्याची सुविधा मिळणार आहे. 

नवी दिल्ली- भारतीय पोस्ट ऑफिसनं आता आपल्याला बँकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे. या सेवा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचाव्यात, त्यासाठी त्यांना ऑनलाइन केल्या आहेत. आता आपण आरडी, पीएफ योजनेशी संबंधित कामं घरी बसून करू शकता. पोस्ट ऑफिसनं ग्राहकांना काही अशा छोट्या छोट्या उपलब्ध करून दिल्यात ज्यात तुम्ही मोठा फायदा मिळवू शकता. पोस्ट ऑफिस आपल्याला जीवन विमा संरक्षणसारख्या सुविधा पुरवते. तसेच पोस्टातील कर्मचारी हे सरकारचं एक माध्यम म्हणून काम करतात. यात वयोवृद्धांना पेन्शन पेमेंट योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचाही लाभ दिला जातो.  

आता ग्राहक घरबसल्या करू शकतो हे काम

  • ग्राहक आता इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सर्व कामे करू शकतात
  • यात 17 कोटी पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांना ऑनलाइन पैसे वळते करण्याची सुविधा मिळणार आहे. 
  • तसेच ग्राहक ऑनलाइन देवाण-घेवाणीचे व्यवहारही करू शकणार आहेत. 
  • इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आपण RD, TD, पीपीएफ खाती उघडू शकतो.  


कसं सुरू कराल रेकरिंग डिपॉझिट- आरडी खातं पोस्ट ऑफिस किंवा जाऊन उघडता येतं, तसेच आपण हे खातं ऑनलाइनही उघडू शकतो. पोस्टात आरडी उघडण्यासाठी तुम्हाला रोख रक्कम किंवा धनादेश द्यावा लागतो. तुमचं खातं एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्येही ट्रान्सफर करता येते. तसेच दोन जणांच्या नावे संयुक्त खातंही उघडता येते. आरडी खातं उघडण्यापूर्वी पहिल्यांदा कुठे जास्त व्याज मिळत ते पाहावे. जर आपल्याला आरडीवर 10 हजारांहून अधिक व्याज मिळत असेल तर त्यावर आपल्याला कर द्यावा लागू शकतो. पोस्ट खात्यातील 1 ते 5 वर्ष आरडी योजनेत ग्राहकाला 6.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. मात्र, आरडीवर 10 हजारपेक्षा अधिक वार्षिक व्याज मिळत असेल तर त्यासाठी ग्राहकांना टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना यावर कर बसेल. 

यासाठी आरडी करणे फायदेशीर 

  • यामध्ये तुम्ही तुमच्या बचतीनुसार दरमहिन्याला बचत करु शकता. 
  • एका विशिष्ठ लक्ष्यानुसार तुम्ही रक्कम बचत करु शकता. 
  • यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिळणारे व्याजदर निश्चित स्वरुपाचे आहे. ग्राहकांसाठी हा सर्वात मोठा फायदा आहे. 
  • नियमित व्याजसह फिक्स डिपॉजीटसाठीही याचा फायदा होतो. तुम्ही 10 वर्षांपर्यंत ही मुदतवाढ करु शकता. 
  • विशेष म्हणजे एका वर्षानंतर तुम्ही बचत खात्यातून 50 टक्के रक्कम काढूही शकता. 

Web Title: india post starts internet banking facility for its savings account customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.