Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेल्वेचे तिकीट कन्फर्म न झाल्यास विमानप्रवास!, एअर इंडियावर सारे अवलंबून

रेल्वेचे तिकीट कन्फर्म न झाल्यास विमानप्रवास!, एअर इंडियावर सारे अवलंबून

नवी दिल्ली : रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसच्या एसी-१ आणि एसी-२ श्रेणीचे तिकीट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना थेट विमान प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल. तिकिटातील फरकाचे पैसे मात्र प्रवाशास द्यावे लागतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 04:03 AM2017-10-24T04:03:07+5:302017-10-24T04:03:17+5:30

नवी दिल्ली : रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसच्या एसी-१ आणि एसी-२ श्रेणीचे तिकीट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना थेट विमान प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल. तिकिटातील फरकाचे पैसे मात्र प्रवाशास द्यावे लागतील.

If the train ticket is not confirmed, the airplane !, depending on AirIndia | रेल्वेचे तिकीट कन्फर्म न झाल्यास विमानप्रवास!, एअर इंडियावर सारे अवलंबून

रेल्वेचे तिकीट कन्फर्म न झाल्यास विमानप्रवास!, एअर इंडियावर सारे अवलंबून

नवी दिल्ली : रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसच्या एसी-१ आणि एसी-२ श्रेणीचे तिकीट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना थेट विमान प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल. तिकिटातील फरकाचे पैसे मात्र प्रवाशास द्यावे लागतील. गेल्या वर्षीचा हा प्रस्ताव आता पुन्हा चर्चेत आला आहे.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष असलेले अश्वनी लोहानी आधी एअर इंडियाचे प्रमुख असताना, त्यांनी हा प्रस्ताव रेल्वेकडे पाठविला होता. एअर इंडियाला संकटातून बाहेर काढण्यास त्यांनी अनेक उपाययोजना केल्या. त्यात रेल्वे प्रवाशांना हवाई प्रवासाकडे वळविण्याचा प्रस्ताव होता. तथापि, रेल्वेने या प्रस्तावाला प्रतिसादच दिला नाही. हा प्रस्ताव देणारे अश्वनी लोहानी हेच आता रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितले की, एअर इंडियाकडून असा प्रस्ताव आल्यास आपण त्याला मंजुरी देऊ.
लोहानी म्हणाले की, राजधानीचे तिकीट कन्फर्म न होण्याचे प्रमाण खूप आहे, राजधानीच्या एसी-१ व एसी-२ श्रेणीतील तिकिटांचा व विमान तिकिटांचा दर यातही थोडा फरक आहे. विशेषत: एसी-२ चे तिकीट आणि विमानाचे तिकीट यात अगदीच किरकोळ फरक आहे. थोडे अधिक पैसे मोजण्याची तयारी
ठेवणाºया प्रवाशांची संख्या मोठी असू शकते हे गृहीत धरून आपण हा प्रस्ताव दिला होता.
>खासगीकरणामुळे प्रस्तावात अडचणी
लोहानी यांनी या प्रस्तावाचा मुद्दा पुन्हा समोर आणला असला तरी
आता परिस्थिती बरीच बदलली
आहे. सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू
केली आहे. त्यामुळे या प्रस्तावाचे भवितव्य अधांतरीच आहे.

Web Title: If the train ticket is not confirmed, the airplane !, depending on AirIndia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.