मोठ्या रकमा भरणा-यांवर हिशेब न दिल्यास कारवाई, व्यवहार स्वच्छ असल्याचे सिद्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 2:26am

नोटाबंदीच्या काळात मोठ्या रकमा विविध बँकांच्या खात्यांत जमा करणा-या व्यक्तींना ३१ मार्चपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) दाखल करावी लागणार आहेत. सर्व कंपन्यांनाही हाच नियम लागू राहणार आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात मोठ्या रकमा विविध बँकांच्या खात्यांत जमा करणा-या व्यक्तींना ३१ मार्चपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) दाखल करावी लागणार आहेत. सर्व कंपन्यांनाही हाच नियम लागू राहणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या वतीने शुक्रवारी यासंबंधीचे आवाहन करण्यात आले. प्राप्तिकर विभागाने म्हटले की, नोटाबंदीच्या काळात मोठ्या रकमा बँक खात्यांत जमा करणारे नागरिक, तसेच सर्व कंपन्या यांना ३१ मार्चपूर्वी आपले प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. असे न केल्यास दंड आणि खटल्यांचा सामना करावा लागेल. पात्र विश्वस्त संस्था, राजकीय पक्ष आणि संघटना यांनी अंतिम तिथीच्या आत विवरणपत्र दाखल करून आपले व्यवहार स्वच्छ असल्याचे सिद्ध करावे. प्राप्तिकर विभागाने दैनिकांत याबाबत जाहिरात दिली आहे. यात म्हटले आहे की, २0१६-१७ आणि २0१७-१८ या आढावा वर्षांसाठी उशिराचे अथवा सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची ही आता अंतिम मुदत आहे. या श्रेणीत येणाºया करदात्यांसाठी अजूनही वेळ गेलेली नाही. शेवटच्या क्षणी गर्दी करण्यापेक्षा मुदतीच्या आत आयटीआर दाखल करावा. तुमच्या खात्यांमध्ये मोठ्या रकमा भरल्या असतील, मोठे आर्थिक व्यवहार केले असतील, तर कृपया वेळेत आयटीआर दाखल करा. आयटीआर न भरणे अथवा चुकीका भरल्यास कारवाईचा सामना करावा लागेल. संस्था, संघटना, पक्षांनाही हाच नियम प्राप्तिकर विभागाने असेही म्हटले आहे की, सर्व कंपन्या, संस्था आणि मर्यादित दायित्व भागीदारी संस्था यांनाही हाच नियम लागू आहे. त्यांनाही आयटीआर भरण्यासाठी हीच मुदत आहे. विश्वस्त संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष यांनाही हाच नियम लागू आहे. वरील संस्था-संघटनांपैकी ज्यांचे उत्पन्न कर सवलतीच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना ३१ मार्चपूर्वी आयटीआर दाखल करावा लागणार आहे.

संबंधित

नोटबंदी : 'त्या' 2 लाख लोकांना आयकर विभागाची नोटीस , द्यावा लागणार हिशेब
शेल कंपन्यांभोवती फास आवळला! प्राप्तिकर विभागाने आयटीआर न भरण्याची सवलत केली रद्द
शाहरूख खानला बचावासाठी तीन महिने, आवश्यक कागदपत्रं सादर करण्याचे आदेश
अकोल्यातील बँकांना प्राप्तिकर अधिकार्‍यांची नोटीस; आहुजा-मोटवाणी फर्मची तपासणी!
नागपूरच्या प्राप्तिकर अधिकार्‍यांनी ठोकला अकोल्यात तळ

व्यापार कडून आणखी

जाणून घ्या मोदींच्या राजवटीत कुठल्या क्षेत्रात किती नोकऱ्या निर्माण झाल्या, मॅन्युफॅक्चरींग सेक्टरला जबर झटका
पीएनबी घोटाळा ३0 हजार कोटींचा?
जाहिरात महसूल यंदा १२ टक्क्याने वाढणार, वृत्तपत्रांना मात्र सर्वांत कमी महसूल
पीएनबी घोटाळ्याने उभे केले नवे प्रश्न
नीरव मोदीला साह्य करण्यासाठी बँक अधिका-यांनी शेअर केले पासवर्ड

आणखी वाचा