lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोठ्या रकमा भरणा-यांवर हिशेब न दिल्यास कारवाई, व्यवहार स्वच्छ असल्याचे सिद्ध करा

मोठ्या रकमा भरणा-यांवर हिशेब न दिल्यास कारवाई, व्यवहार स्वच्छ असल्याचे सिद्ध करा

नोटाबंदीच्या काळात मोठ्या रकमा विविध बँकांच्या खात्यांत जमा करणा-या व्यक्तींना ३१ मार्चपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) दाखल करावी लागणार आहेत. सर्व कंपन्यांनाही हाच नियम लागू राहणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:26 AM2018-02-10T02:26:26+5:302018-02-10T02:26:34+5:30

नोटाबंदीच्या काळात मोठ्या रकमा विविध बँकांच्या खात्यांत जमा करणा-या व्यक्तींना ३१ मार्चपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) दाखल करावी लागणार आहेत. सर्व कंपन्यांनाही हाच नियम लागू राहणार आहे.

If there is no accounting for large amounts, the actions prove that the transaction is clean | मोठ्या रकमा भरणा-यांवर हिशेब न दिल्यास कारवाई, व्यवहार स्वच्छ असल्याचे सिद्ध करा

मोठ्या रकमा भरणा-यांवर हिशेब न दिल्यास कारवाई, व्यवहार स्वच्छ असल्याचे सिद्ध करा

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात मोठ्या रकमा विविध बँकांच्या खात्यांत जमा करणा-या व्यक्तींना ३१ मार्चपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) दाखल करावी लागणार आहेत. सर्व कंपन्यांनाही हाच नियम लागू राहणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या वतीने शुक्रवारी यासंबंधीचे आवाहन करण्यात आले.
प्राप्तिकर विभागाने म्हटले की, नोटाबंदीच्या काळात मोठ्या रकमा बँक खात्यांत जमा करणारे नागरिक, तसेच सर्व कंपन्या यांना ३१ मार्चपूर्वी आपले प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. असे न केल्यास दंड आणि खटल्यांचा सामना करावा लागेल. पात्र विश्वस्त संस्था, राजकीय पक्ष आणि संघटना यांनी अंतिम तिथीच्या आत विवरणपत्र दाखल करून आपले व्यवहार स्वच्छ असल्याचे सिद्ध करावे.
प्राप्तिकर विभागाने दैनिकांत याबाबत जाहिरात दिली आहे. यात म्हटले आहे की, २0१६-१७ आणि २0१७-१८ या आढावा वर्षांसाठी उशिराचे अथवा सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची ही आता अंतिम मुदत आहे. या श्रेणीत येणाºया करदात्यांसाठी अजूनही वेळ गेलेली नाही. शेवटच्या क्षणी गर्दी करण्यापेक्षा मुदतीच्या आत आयटीआर दाखल करावा. तुमच्या खात्यांमध्ये मोठ्या रकमा भरल्या असतील, मोठे आर्थिक व्यवहार केले असतील, तर कृपया वेळेत आयटीआर दाखल करा. आयटीआर न भरणे अथवा चुकीका भरल्यास कारवाईचा सामना करावा लागेल.

संस्था, संघटना, पक्षांनाही हाच नियम
प्राप्तिकर विभागाने असेही म्हटले आहे की, सर्व कंपन्या, संस्था आणि मर्यादित दायित्व भागीदारी संस्था यांनाही हाच नियम लागू आहे. त्यांनाही आयटीआर भरण्यासाठी हीच मुदत आहे. विश्वस्त संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष यांनाही हाच नियम लागू आहे. वरील संस्था-संघटनांपैकी ज्यांचे उत्पन्न कर सवलतीच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना ३१ मार्चपूर्वी आयटीआर दाखल करावा लागणार आहे.

Web Title: If there is no accounting for large amounts, the actions prove that the transaction is clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.