Lokmat Money > बिझनेस न्यूज > टीडीएस विवरणपत्र वेळेत सादर न केल्यास रोज २०० रुपये दंड

टीडीएस विवरणपत्र वेळेत सादर न केल्यास रोज २०० रुपये दंड

जानेवारी ते मार्च या तिमाहीतील टीडीएस कपातीचे विवरणपत्र ३१ मेच्या आत सादर करा, अन्यथा त्यापुढील प्रत्येक दिवसासाठी २०० रुपये दंड आकारण्याचा इशारा प्राप्तिकर विभागाने टीडीएस कपातकर्त्यांना दिला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:37 PM2018-05-18T23:37:34+5:302018-05-18T23:37:34+5:30

जानेवारी ते मार्च या तिमाहीतील टीडीएस कपातीचे विवरणपत्र ३१ मेच्या आत सादर करा, अन्यथा त्यापुढील प्रत्येक दिवसासाठी २०० रुपये दंड आकारण्याचा इशारा प्राप्तिकर विभागाने टीडीएस कपातकर्त्यांना दिला आहे.

If the TDS statement is not submitted in time, the penalty of 200 rupees per day | टीडीएस विवरणपत्र वेळेत सादर न केल्यास रोज २०० रुपये दंड

टीडीएस विवरणपत्र वेळेत सादर न केल्यास रोज २०० रुपये दंड

नवी दिल्ली : जानेवारी ते मार्च या तिमाहीतील टीडीएस कपातीचे विवरणपत्र ३१ मेच्या आत सादर करा, अन्यथा त्यापुढील प्रत्येक दिवसासाठी २०० रुपये दंड आकारण्याचा इशारा प्राप्तिकर विभागाने टीडीएस कपातकर्त्यांना दिला आहे.
प्राप्तिकर विभागासाठी धोरणे ठरविणाऱ्या केंद्रीय थेट कर बोर्डाने आघाडीच्या वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करून हा इशारा दिला आहे. यात म्हटले आहे की, गेल्या तिमाहीतील टीडीएस कपातीची विवरणपत्रे सादर करण्याची मुदत ३१ मेपर्यंतच आहे. विवरणपत्रे सादर न करणा-यांनी ती तातडीने सादर करावीत. प्राप्तिकर विभागाच्या या वेबसाइटवर नोंदणी करून ही विवरणपत्रे सादर करावयाची आहेत.
प्राप्तिकर विभागाने म्हटले की, विवरणपत्रे सादर करताना कपातकर्त्यांनी टॅन क्रमांक (टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर), तसेच ज्यांचे टीडीएस कापले गेले आहेत, त्यांचा पॅन क्रमांकही अचूक लिहावा. करदात्यांना त्यांचे योग्य कर क्रेडिट मिळावे, यासाठी हे क्रमांक आवश्यक आहेत.
>...तर नोटीस येणारच
प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, तिमाहीत टीडीएस अथवा टीएसएस लागत नसला, तरी त्याची सूचना संबंधित वेबसाइटवर देणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधितास विवरणपत्र दाखल न केल्याबद्दल नोटीस येऊ शकते. नियमानुसार, रोजगारदात्या कंपनी अथवा संस्थेने आपल्या कर्मचाºयांच्या वेतनातून टीडीएस कापून दर तीन महिन्यांनी प्राप्तिकर विभागाकडे भरणे आवश्यक आहे, तसेच या भरण्याचे विवरणपत्रही एक महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.

Web Title: If the TDS statement is not submitted in time, the penalty of 200 rupees per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.