Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षपदी एम.डी. मल्ल्या?

आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षपदी एम.डी. मल्ल्या?

चंदा कोचर प्रकरणानंतर आता आयसीआयसीआय बँक दक्षतेने पुढील धोरण आखत आहे. बँकेत मोठ्या प्रमाणावर बदलाचे वारे सुरू झाले असून, सध्याचे अध्यक्ष एम. के. शर्मा यांच्याजागी एम. डी. मल्ल्या यांच्यासारख्या मातब्बर बँकरची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 03:50 AM2018-06-23T03:50:46+5:302018-06-23T03:50:49+5:30

चंदा कोचर प्रकरणानंतर आता आयसीआयसीआय बँक दक्षतेने पुढील धोरण आखत आहे. बँकेत मोठ्या प्रमाणावर बदलाचे वारे सुरू झाले असून, सध्याचे अध्यक्ष एम. के. शर्मा यांच्याजागी एम. डी. मल्ल्या यांच्यासारख्या मातब्बर बँकरची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

ICICI Bank Chairman M.D. Mallya? | आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षपदी एम.डी. मल्ल्या?

आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षपदी एम.डी. मल्ल्या?

मुंबई : चंदा कोचर प्रकरणानंतर आता आयसीआयसीआय बँक दक्षतेने पुढील धोरण आखत आहे. बँकेत मोठ्या प्रमाणावर बदलाचे वारे सुरू झाले असून, सध्याचे अध्यक्ष एम. के. शर्मा यांच्याजागी एम. डी. मल्ल्या यांच्यासारख्या मातब्बर बँकरची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.
व्हिडीओकॉन प्रकरण समोर आल्यानंतर, बँकेचे अध्यक्ष एम.के. शर्मा यांचा सुरुवातीला चंदा कोचर यांना पाठिंबा होता. या प्रकरणाशी कोचर यांचा थेट संबंध नसल्याचे सांगत, कुठल्याही प्रकारच्या कारवाईबाबत शर्मा यांनी नरमाईची भूमिका घेतली, पण सर्व बाजूने दबाव आल्यानंतर व प्रामुख्याने स्वतंत्र संचालकांनी ठोस भूमिका घेतल्याने चंदा कोचर यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. आता याच स्वतंत्र संचालकांपैकी मल्ल्या हे बँकेचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
एम. के. शर्मा यांचा कार्यकाळ ३० जूनला संपत आहे, पण त्यांना कुठलीही मुदतवाढ देण्यास संचालक मंडळ तयार नाही. त्यामुळे बँक आॅफ बडोदाचे माजी अध्यक्ष असलेले एम.डी. मल्ल्या यांची या पदावरील नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. मल्ल्या यांना हे पद देतानाच, अध्यक्षपद फिरते ठेवण्याबाबतही संचालक मंडळ गांभीर्याने विचार करीत आहे.

Web Title: ICICI Bank Chairman M.D. Mallya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.