Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘एचएसबीसी इन्व्हेस्ट डायरेक्ट’ने ३.३0 कोटी रुपयांत केली तडजोड

‘एचएसबीसी इन्व्हेस्ट डायरेक्ट’ने ३.३0 कोटी रुपयांत केली तडजोड

‘एचएसबीसी इन्व्हेस्ट डायरेक्ट सेक्युरिटीज’ या कंपनीने स्टॉक ब्रोकर नियमांचा भंग केल्याच्या प्रकरणात सेबीसोबत तडजोड करून वाद मिटवला आहे. ३.३0 कोटी रुपये तडजोड शुल्क भरून कंपनीने हा वाद निकाली काढला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:49 AM2018-01-19T01:49:13+5:302018-01-19T01:49:16+5:30

‘एचएसबीसी इन्व्हेस्ट डायरेक्ट सेक्युरिटीज’ या कंपनीने स्टॉक ब्रोकर नियमांचा भंग केल्याच्या प्रकरणात सेबीसोबत तडजोड करून वाद मिटवला आहे. ३.३0 कोटी रुपये तडजोड शुल्क भरून कंपनीने हा वाद निकाली काढला आहे.

 'HSBC Invest Direct' compromised between Rs 3.30 crores | ‘एचएसबीसी इन्व्हेस्ट डायरेक्ट’ने ३.३0 कोटी रुपयांत केली तडजोड

‘एचएसबीसी इन्व्हेस्ट डायरेक्ट’ने ३.३0 कोटी रुपयांत केली तडजोड

मुंबई : ‘एचएसबीसी इन्व्हेस्ट डायरेक्ट सेक्युरिटीज’ या कंपनीने स्टॉक ब्रोकर नियमांचा भंग केल्याच्या प्रकरणात सेबीसोबत तडजोड करून वाद मिटवला आहे. ३.३0 कोटी रुपये तडजोड शुल्क भरून कंपनीने हा वाद निकाली काढला आहे.
तडजोड नियमांच्या आधारे एचएसबीसी इन्व्हेस्ट डायरेक्ट सेक्युरिटीज (इंडिया) लि. कंपनीने सेबीकडे तडजोडीसाठी अर्ज सादर केला होता. त्यावर सेबीनेही
सहमती दर्शविली. आरोप मान्य न करता अथवा न फेटाळता तडजोड करण्याची तरतूद या नियमात आहे. त्यानुसारच ही तडजोड
झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी सेबीने तडजोडीचा आदेशही जारी केला आहे. आदेशात म्हटले आहे की, सेबी (मध्यस्थता) नियम २०१८ नुसार हा वाद निकाली काढण्यात आला आहे. आता सेबी एचएसबीसी इन्व्हेस्ट डायरेक्ट सेक्युरिटीज कंपनीविरुद्ध कोणतीही कारवाई करणार नाही.
एचएसबीसी इन्व्हेस्ट डायरेक्ट सेक्युरिटीज ही ब्रोकरेज कंपनी आहे. कंपनीने अदाणी पोर्टस्सोबतच्या व्यवहारात स्टॉक ब्रोकर नियमांचा भंग केल्याचा आरोप होता. त्यावरून सेबीने कंपनीविरुद्ध जुलै २००९ मध्ये नियमभंगाची कारवाई सुरू केली होती. ही कारवाई प्रलंबित होती. आधी आयएल अ‍ॅण्ड एफएस इन्व्हेस्टमार्ट या कंपनीने सेबीकडे तडजोडीसाठी अर्ज केला होता.

Web Title:  'HSBC Invest Direct' compromised between Rs 3.30 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.