Lokmat Money > बिझनेस न्यूज > 100 रुपयांच्या नव्या बनावट नोटांचा सुळसुळाट, अशी ओळखा खरी नोट

100 रुपयांच्या नव्या बनावट नोटांचा सुळसुळाट, अशी ओळखा खरी नोट

आरबीआयनं 200, 500, 2000 रुपयांच्या नोटेनंतर आता भारतीय नागरिकांना 100 रुपयांची नवी नोट उपलब्ध करून दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 11:33 AM2018-11-19T11:33:17+5:302018-11-19T15:11:09+5:30

आरबीआयनं 200, 500, 2000 रुपयांच्या नोटेनंतर आता भारतीय नागरिकांना 100 रुपयांची नवी नोट उपलब्ध करून दिली आहे.

How To Check RBI's 100 Rs Fake Note | 100 रुपयांच्या नव्या बनावट नोटांचा सुळसुळाट, अशी ओळखा खरी नोट

100 रुपयांच्या नव्या बनावट नोटांचा सुळसुळाट, अशी ओळखा खरी नोट

नवी दिल्ली- आरबीआयनं 200, 500, 2000 रुपयांच्या नोटेनंतर आता भारतीय नागरिकांना 100 रुपयांची नवी नोट उपलब्ध करून दिली आहे. बँकांनी ग्राहकांना 100 रुपयांच्या नव्या नोट देण्यास सुरुवात केली आहे. एटीएममधूनही आता नव्या नोट मिळत आहेत. आरबीआयच्या रिपोर्टनुसार, 2017-18मध्ये 100 रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा सापडल्यात. त्यामुळे आपल्याला खऱ्या नोटेची ओळख होणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्या हातात बनावट नोट पडणार नाही.

आरबीआयनं स्वतःच्या या नव्या नोटेचे सेफ्टी फीचर्स जारी केले आहेत. नवी नोट ओळखण्यासाठी आरबीआयनं paisaboltahai.rbi.org.in या वेबसाइटवर सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे. या फीचर्समुळे नव्या नोटा ओळखता येऊ शकतात. 100 रुपयांच्या या नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा आहे. नव्या नोटेच्या मागच्या बाजूला गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरी(बावडी)ची झलक पाहायला मिळतेय...

कशी आहे 100 रुपयांची नवी नोट

  • 100 रुपयांच्या नव्या नोटेचा आकार 66 एमएमX135 एमएम आहे. 
  • या नोटेच्या पुढील भागात देवनागरीमध्ये 100 रुपये असं लिहिलं आहे. 
  • नोटेच्या मधोमध महात्मा गांधींचा फोटो आहे. 
  • या नोटेवर छोट्या अक्षरांत 'RBI', 'भारत', 'India' आणि "100'' रुपये असं लिहिलं आहे.  
  • महात्मा गांधींच्या डाव्या बाजूला गव्हर्नर यांची स्वाक्षरी व आरबीआयचं चिन्हं आहे. 
  • नोटेच्या मागच्या बाजूला स्वच्छ भारताचा लोगो, राणी की वाव आणि देवनागरी मूल्यवर्ग अंकात 100 असं लिहिलं आहे. 
  • रंग बदलाबरोबरच “भारत”, RBI’ असं या नोटेवर लिहिलं आहे. नोटेला तिरपे करून पाहिल्यावर त्या दोरीचा कलर हिरव्या पासून निळा होतो.
  • महात्मा गांधींच्या चित्राच्या बाजूला गारंटी खंड, वचन खंड लिहिलं आहे. 
  • उजव्या बाजूला अशोक स्तंभ असून, इलेक्ट्रोटाइप (100) वॉटरमार्क आहेत. 


नोटेच्या मागच्या भागाचे फीचर्स 

  • नोटेच्या डाव्या बाजूला मुद्रण वर्ष 
  • स्लोगन आणि स्वच्छ भारत लोगो 
  • भाषा पॅनल

    कशी ओळखाल नवी नोट ?
     
  •  नोट प्रकाशात पाहून 100 चा अंक(denomination) आरपार दिसतो का ते पाहा?
  •  100च्या अंकासोबत लेटेंट चित्र आहे का तेही तपासून घ्या
  •  देवनागरी 100 अंक लिहिलेला आहे का याची खात्री करा 
  •  नोटेवर महात्मा गांधींचे चित्र आहे का ते पाहून घ्या 
  •  बारीक अक्षरात ‘RBI’, ‘भारत’, ‘INDIA’ आणि ‘100’ आहे का त्याचीसुद्धा खात्री करा

Web Title: How To Check RBI's 100 Rs Fake Note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.