Lokmat Money > बिझनेस न्यूज > २0१९ मध्ये हॉटेलचे दर ३.७ टक्क्यांनी वाढणार

२0१९ मध्ये हॉटेलचे दर ३.७ टक्क्यांनी वाढणार

र्थव्यवस्थेची वृद्धी आणि तेलाच्या वाढत्या किमती यांचा हा परिणाम असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:14 AM2018-07-25T00:14:11+5:302018-07-25T00:14:26+5:30

र्थव्यवस्थेची वृद्धी आणि तेलाच्या वाढत्या किमती यांचा हा परिणाम असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

Hotel will increase by 3.7% in 2019 | २0१९ मध्ये हॉटेलचे दर ३.७ टक्क्यांनी वाढणार

२0१९ मध्ये हॉटेलचे दर ३.७ टक्क्यांनी वाढणार

मुंबई : २0१९ मध्ये जागतिक पातळीवर प्रवास महागणार आहे. हॉटेलांच्या दरांत ३.७ टक्के, तर हवाई वाहतुकीच्या दरात २.६ टक्के वाढ अपेक्षित आहे. अर्थव्यवस्थेची वृद्धी आणि तेलाच्या वाढत्या किमती यांचा हा परिणाम असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
कार्लसन वॅगोनलिट ट्रॅव्हल (सीडब्ल्यूटी) या संस्थेने कार्लसन फॅमिली फाऊंडेशनच्या साह्याने ‘जागतिक प्रवास अंदाज’ या विषयावरील पाचवा वार्षिक अहवाल जारी केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली. अहवालात म्हटले आहे की, अनेक अर्थव्यवस्थेत महागाईचा दर कमीच असला तरीही प्रवास महागणार आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे हवाई प्रवासाचे दर वाढतील. पायलटांच्या टंचाईमुळे निर्माण झालेला स्पर्धात्मक दबाव आणि संभाव्य व्यापार युद्धे यांचाही परिणाम हवाई प्रवासांच्या दरावर होणार आहे.
अहवालात म्हटले की, हवाई प्रवासाच्या दरातील वाढ आशिया प्रशांत विभागात ३.२ टक्के, चीनमध्ये ३.९ टक्के, न्यूझिलंडमध्ये ७.५ टक्के आणि भारतात ७.३ टक्के राहील. नोटाबंदी आणि आणि जीएसटी यांचा परिणाम ओसरत असल्यामुळे भारतातील वृद्धी मजबूत राहील.
हवाई प्रवासात वाढ झाल्यामुळे हॉटेलांच्या खोल्यांची मागणी वाढेल. त्यामुळे हॉटेलांचे दरही वाढतील. हॉटेलांचे दर आशिया प्रशांतमध्ये ५.१ टक्क्यांनी आणि न्यूझिलंडमध्ये ११.८ टक्क्यांनी वाढतील.

Web Title: Hotel will increase by 3.7% in 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.