Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रामाणिक करदात्यांवर कर्जबुडव्यांमुळे बोजा, फिक्कीच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींचे बोल

प्रामाणिक करदात्यांवर कर्जबुडव्यांमुळे बोजा, फिक्कीच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींचे बोल

बँकांची कर्जे हेतूत: थकविणाऱ्यांमुळे प्रामाणिक करदात्यांवरच अकारण बोजा पडतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. फिक्की लेडीज आॅर्गनायझेशनच्या (एफएलओ) वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:53 AM2018-04-06T00:53:15+5:302018-04-06T00:53:15+5:30

बँकांची कर्जे हेतूत: थकविणाऱ्यांमुळे प्रामाणिक करदात्यांवरच अकारण बोजा पडतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. फिक्की लेडीज आॅर्गनायझेशनच्या (एफएलओ) वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.

Honorable taxpayers burden them due to slackers, President's speech in FICCI program | प्रामाणिक करदात्यांवर कर्जबुडव्यांमुळे बोजा, फिक्कीच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींचे बोल

प्रामाणिक करदात्यांवर कर्जबुडव्यांमुळे बोजा, फिक्कीच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींचे बोल

नवी दिल्ली - बँकांची कर्जे हेतूत: थकविणाऱ्यांमुळे प्रामाणिक करदात्यांवरच अकारण बोजा पडतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. फिक्की लेडीज आॅर्गनायझेशनच्या (एफएलओ) वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.
सरकारी बँकांकडून घेतलेली कर्जे हेतूत: न भरणाºया थकबाकीदारांची संख्या डिसेंबर २०१७ला ९,०६३ झाली आहे. या थकबाकीदारांकडे १,१०,०५० कोटी रुपयांची रक्कम थकली आहे. राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, वास्तविक व्यावसायिक अपयशाच्या घटनाही घडत असतात. तथापि, जेव्हा हेतूत: आणि गुन्हेगारी स्वरूपात कर्ज थकविले जाते, तेव्हा त्याचा फटका सामान्य भारतीय नागरिकांना बसतो. निष्पाप नागरिकांनाच तोटा सहन करावा लागतो. अंतिमत: प्रामाणिक करदात्यांवर त्याचा बोजा पडतो.
गेल्याच महिन्यात वित्तमंत्र्यांनी संसदेत सांगितले होते की, गेल्या आठ वर्षांपासून बँकिंग क्षेत्रातील अनुत्पादक भांडवल (एनपीए) हळूहळू वाढत आहे. डिसेंबर २०१७च्या अखेरीस सरकारी बँकांचा एनपीएन ७.७७ लाख कोटींवर गेला आहे. याशिवाय बँकांना कर्ज घोटाळ्यांचाही सामना करावा लागत आहे. पंजाब नॅशनल बँकेसह अनेक बँकांतील कर्ज घोटाळे गेल्या काही महिन्यांपासून उघडकीस येत आहेत.
व्यावसायिक क्षेत्रातही
महिलांवर अन्यायच
राष्टÑपती कोविंद यांनी व्यावसायिक क्षेत्रात महिलांना त्यांचा योग्य वाटा दिला जात नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. लैंगिक भेदभाव रोखण्यासाठी भारतीय कंपन्यांनी संवेदशील पुरवठा साखळी तयार करावी. देशाच्या लोकसंख्येत महिलांचे प्रमाण निम्मे आहे. त्या
घरी व कामाच्या अशा दोन्ही आघाड्यांवर आपले योगदान
देतात. तथापि, जेव्हा व्यवसायाचा विषय येतो, तेव्हा त्यांना योग्य संधी दिली जात नाही.

नऊ महिलांचा सन्मान

फिक्की लेडीज आॅर्गनायझेशनच्या (एफएलओ) अधिवेशनात समाजाच्या विविध क्षेत्रांत अद्वितीय काम करणाºया नऊ महिलांना एफएलओ आयकॉन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध लेखिका व अभिनेत्री टिष्ट्वंकल खन्ना, निर्मात्या एकता कपूर आणि शास्त्रज्ञ टेस्सी थॉमस यांचा त्यात समावेश आहे.

Web Title: Honorable taxpayers burden them due to slackers, President's speech in FICCI program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.