lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आफ्रिकी देशांना हव्या आरोग्य सेवा

आफ्रिकी देशांना हव्या आरोग्य सेवा

गरिबीमुळे असंख्य आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या आफ्रिकन देशांना भारतीय वैद्यकीय सेवेची आस आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:52 PM2018-05-17T23:52:05+5:302018-05-17T23:52:05+5:30

गरिबीमुळे असंख्य आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या आफ्रिकन देशांना भारतीय वैद्यकीय सेवेची आस आहे.

Honey health service to African countries | आफ्रिकी देशांना हव्या आरोग्य सेवा

आफ्रिकी देशांना हव्या आरोग्य सेवा

मुंबई : गरिबीमुळे असंख्य आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या आफ्रिकन देशांना भारतीय वैद्यकीय सेवेची आस आहे. त्यामुळे या सेवांसाठी भारताने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा या देशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
वाणिज्य मंत्रालय, राज्य सरकार, सीआयआय व सर्व्हिसेस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलतर्फे (एसईपीसी) येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये जागतिक सेवा क्षेत्र परिषद (जीईएस) सुरू आहे. १०० देशांचे प्रतिनिधी या परिषदेत आले आहेत. रवांडाचे आरोग्य अधिकारी कायिबांदू जोसेफ यांनी सांगितले की, सुमारे दशकभर नागरी युद्धाच्या झळा सोसलेल्या रवांडामध्ये हॉस्पिटल्सची कमतरता आहे. त्यासाठीचा खर्च करण्यासाठी कंपन्याच नाहीत. त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या भागीदारीने हॉस्पिटल्स उभी राहावीत, यासाठी आमचे सरकार प्रयत्न करीत आहे.

Web Title: Honey health service to African countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.