lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाद नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत, ७४५.५९ कोटी झाले जमा

बाद नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत, ७४५.५९ कोटी झाले जमा

भाजपाध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत नोटाबंदीनंतर सर्वाधिक पैसे जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:58 AM2018-06-22T04:58:13+5:302018-06-22T04:58:13+5:30

भाजपाध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत नोटाबंदीनंतर सर्वाधिक पैसे जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.

The highest payment of the post was done at the bank of Amit Shah, 745.59 crore | बाद नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत, ७४५.५९ कोटी झाले जमा

बाद नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत, ७४५.५९ कोटी झाले जमा

- कैद नज़मी।
मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत नोटाबंदीनंतर सर्वाधिक पैसे जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बँकेत नोटाबंदीनंतर पाच दिवसांत ७४५.५९ कोटी रुपये जमा झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना १४ नोव्हेंबर रोजी जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली. तोपर्यंत राजकोट जिल्हा सहकारी बँकेनेही ६९३.१९ कोटींच्या बाद नोटा स्वीकारल्या.
गुजरात सरकारमधील कॅबिनेट मंत्री जयेशभाई रदडिया हे बँकेचे अध्यक्ष आहेत. अशाप्रकारे नोटाबंदी काळात सर्वाधिक रक्कम स्वीकारणाऱ्या बँका भाजपा नेत्यांच्याच असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी नाबार्डकडून मागविलेल्या माहितीत समोर आले आहे.
>राज्य सरकारी बँकेत ११२८ कोटी
नोटाबंदी काळात महाराष्टÑ राज्य सहकारी बँकेनेही मुबलक प्रमाणात बाद नोटा जमा करुन घेतल्या. बँकेत तब्बल ११२८ कोटी रुपये जमा झाले होते. हा आकडा देशातील राज्य सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक आहे.
>रॉय यांनी सर्व सरकारी बँकांकडून जमा झालेल्या बाद नोटांची माहिती मागितली होती. २१ पैकी फक्त ७ सरकारी बँकांनी माहिती दिली. ३२ राज्य सहकारी बँका, ३७० जिल्हा सहकारी बँका व ३९ टपाल कार्यालयांनी माहिती दिली. सर्वांनी नोटाबंदी काळात ७.९१ लाख कोटींच्या जुन्या नोटा स्वीकारुन रिझर्व्ह बँकेत जमा केल्या.

Web Title: The highest payment of the post was done at the bank of Amit Shah, 745.59 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.