Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता डेबिट, क्रेडिट कार्डाशिवायही ATM मधून काढता येणार पैसे; जाणून घ्या कसे?

आता डेबिट, क्रेडिट कार्डाशिवायही ATM मधून काढता येणार पैसे; जाणून घ्या कसे?

एखाद्या एटीएममध्ये गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर केला जातो. मात्र अनेकदा काही समस्यांमुळे गरजेच्या वेळी पैसे मिळत नाही. मात्र आता सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे कारण क्रेडिट आणि डेबिट कार्ड शिवाय तीन बँकामधून पैसे काढता येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 05:11 PM2019-04-12T17:11:22+5:302019-04-12T17:34:34+5:30

एखाद्या एटीएममध्ये गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर केला जातो. मात्र अनेकदा काही समस्यांमुळे गरजेच्या वेळी पैसे मिळत नाही. मात्र आता सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे कारण क्रेडिट आणि डेबिट कार्ड शिवाय तीन बँकामधून पैसे काढता येणार आहे.

Here's how you can withdraw cash without using credit or debit card at these 3 banks' ATMs | आता डेबिट, क्रेडिट कार्डाशिवायही ATM मधून काढता येणार पैसे; जाणून घ्या कसे?

आता डेबिट, क्रेडिट कार्डाशिवायही ATM मधून काढता येणार पैसे; जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली - सध्याचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. त्यामुळे अनेक गोष्टी स्मार्टफोनवर एका क्लिकच्या मदतीने होतात.  क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. एखाद्या एटीएममध्ये गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर केला जातो. मात्र अनेकदा काही समस्यांमुळे गरजेच्या वेळी पैसे मिळत नाही. मात्र आता सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे कारण क्रेडिट आणि डेबिट कार्ड शिवाय तीन बँकामधून पैसे काढता येणार आहे. SBI, ICICI आणि Axis या तीन बँकांमधून क्रेडिट आणि डेबिट कार्ड शिवाय पैसे काढता येणार आहेत. कार्ड शिवाय पैसे कसे काढायचे हे जाणून घेऊया.

 SBI Bank

स्टेट बँक इंडियाने (एसबीआय) ‘यू ओन्ली नीड वन’ (योनो) हे नवे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. बँकेच्या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरणारे असून यामध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड शिवाय पैसे काढता येणार आहेत. तसेच अ‍ॅपद्वारे खाते उघडणे, पैसे काढणे, भरणे, पैसे दुसऱ्याला पाठविणे, कर्ज मिळविणे, आदी प्रक्रिया करता येणार आहे. विविध सेवा-सुविधा पुरविणाऱ्या, वस्तूंची विक्री करणाऱ्या 85 कंपन्यांसमवेत ‘एसबीआय’ने करार केला आहे. या कंपन्यांची सुविधा अ‍ॅपमध्ये असणार आहे. 

- सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये YONO हे App डाऊनलोड करा. Net banking user ID आणि password किंवा MPIN (Mobile banking Personal Identification number) टाकून लॉग इन करा. 

-  YONO App प्रमाणेच YONO website वरून ही लॉगइन करता येते. लॉग इन केल्यानंतर एक 6 डिजीटवाला YONO कॅश कोड पाठवला जातो.

- 6 डिजीटवाला YONO कॅश कोड मिळाल्यानंतर जवळच्या SBI एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ असणार आहे. जर 30 मिनिटांत पैसे काढले नाही तर हा कोड Expire होणार आहे. 

- SBI नेट बँकिंग अकाऊंटवर पैसे काढणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि नंबर द्यावा लागणार आहे. त्या व्यक्तीला लाभार्थी म्हटलं जाईल.

- फंड ट्रान्सफर टॅबवर क्लिक करा. त्यानंतर cardless cash withdrawal service वर क्लिक करून तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि रक्कम टाका. त्यानंतर रक्कम बँकेतून काढता येईल.

- खातेधारकांना या प्रक्रियेनंतर एक मेसेज येईल. त्यामध्ये एक व्हेरिफीकेशन कोड पाठवला जाईल. एसबीआय बँकेने हा कोड पाठवला आहे.

- ही प्रकिया झाल्यानंतर जो व्यक्ती लाभार्थी आहे म्हणजेच ज्याच्या नावे पैसे पाठवण्यात आले आहे त्यांना आपला मोबाईल नंबर आणि व्हेरिफिकेशन कोड आणि रक्कम ही त्याच्या जवळच्या एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये एंटर करावं लागेल. त्यानंतर ट्रान्सफर करण्यात आलेली रक्कम मिळेल.

 - या सुविधेच्या माध्यमातून खातेधारकांना लाभार्थ्याला एका वेळी कमीतकमी 500  रुपये तर जास्तीतजास्त 10,000 रुपये तर एका दिवसाला 20,000 रुपये पाठवता येतील. 

ICICI Bank

आयसीआयसीआय बँकेने देखील एसबीआयप्रमाणे आपल्या खातेधारकांना कार्ड शिवाय एटीएममधून पैसै काढण्याची सुविधा दिली आहे. विशेष म्हणजे ICICI बँकेने दिलेल्या या सुविधेचा फायदा हा खातेधारकांव्यतिरिक्त अन्य लोकांना ही होणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी फक्त एका मोबाईल क्रमांकाची आवश्यकता आहे. 

- आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कार्ड शिवाय पैसे काढण्यासाठी खातेधारकाला सर्वप्रथम नेट बँकिंगवर लॉगइन करणं गरजेचं आहे. 

- लॉगइन केल्यानंतर कार्डलेस cardless cash withdrawal service या पर्यायावर क्लिक करा.

- या सेवेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला आपल्या नेट बँकिंग अकाऊंटवरून पैसे काढणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि नंबर द्यावा लागणार आहे. त्या व्यक्तीला लाभार्थी म्हटलं जाईल.

- फंड ट्रान्सफर टॅबवर क्लिक करा. त्यानंतर cardless cash withdrawal service वर क्लिक करून तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि रक्कम टाका. त्यानंतर रक्कम बँकेतून काढता येईल.

- खातेधारकांना या प्रक्रियेनंतर एक मेसेज येईल. त्यामध्ये एक 4 डिजीट कोड पाठवला जाईल. तसेच लाभार्थीला पण एक 6 डिजीटवाला कोड पाठवला जाईल. आयसीआयसीआय बँकेने हा कोड पाठवला आहे.

- ही प्रकिया झाल्यानंतर जो व्यक्ती लाभार्थी आहे म्हणजेच ज्याच्या नावे पैसे पाठवण्यात आले आहे त्यांना आपला मोबाईल नंबर, 4 डिजीट कोड आणि 6 डिजीट व्हेरिफिकेशन कोड आणि रक्कम ही त्याच्या जवळच्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये एंटर करावं लागेल. त्यानंतर ट्रान्सफर करण्यात आलेली रक्कम मिळेल. 

- लाभार्थींना याचा फायदा घेण्यासाठी ATMCC PINCODE  टाकून  922220888 नंबरवर  SMS करावा लागेल.

- मेसेज केल्यानंतर cardless cash withdrawal service ची सुविधा असलेल्या एटीएमची माहिती मिळेल. 

- या सुविधेच्या माध्यमातून खातेधारकांना लाभार्थ्याला  एका वेळी 10,000रुपये , एका दिवसाला 20,000 रुपये तर एका महिन्याला जास्तीतजास्त 25,000 रुपये पाठवता येतील. 

Axis Bank

एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेप्रमाणे Axis बँकेनेही आपल्या खातेधारकांना कार्ड शिवाय एटीएममधून पैसै काढण्याची सुविधा दिली आहे. Instant Money Transfer (IMT) ही एक इंटरनेट बँकिंग सेवा आहे जी आपल्याला लाभार्थीला रक्कम पाठविण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे Axis बँकेने दिलेल्या या सुविधेचा फायदा हा खातेधारकांव्यतिरिक्त अन्य लोकांना ही होणार आहे. 

- Axis बँकेच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कार्ड शिवाय पैसे काढण्यासाठी खातेधारकाला सर्वप्रथम Axis बँकेच्या नेट बँकिंगवर लॉगइन करणं गरजेचं आहे. 

- लॉगइन केल्यानंतर cardless cash withdrawal service या पर्यायावर क्लिक करा.

- या सेवेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला आपल्या नेट बँकिंग अकाऊंटवरून पैसे काढणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि नंबर द्यावा लागणार आहे. त्या व्यक्तीला लाभार्थी म्हटलं जाईल.

- फंड ट्रान्सफर टॅबवर क्लिक करा. त्यानंतर cardless cash withdrawal service वर क्लिक करून तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि रक्कम टाका. त्यानंतर रक्कम बँकेतून काढता येईल.

- खातेधारकांना या प्रक्रियेनंतर एक मेसेज येईल. SMS Code (Automatically Axis Bank will generate this and send to it to beneficiary) आणि IMT ID (It is a unique code which can be used to refer your IMT transaction) देण्यात आलेला असेल. 

- ही प्रकिया झाल्यानंतर जो व्यक्ती लाभार्थी आहे म्हणजेच ज्याच्या नावे पैसे पाठवण्यात आले आहे त्यांना आपला मोबाईल नंबर, SMS Code, IMT ID आणि रक्कम ही त्याच्या जवळच्या Axis बँकेच्या एटीएममध्ये एंटर करावं लागेल. त्यानंतर ट्रान्सफर करण्यात आलेली रक्कम मिळेल. 

-  या सुविधेच्या माध्यमातून खातेधारकांना लाभार्थ्याला एका वेळी 10,000 रुपये आणि एका महिन्याला जास्तीतजास्त 25,000 रुपये पाठवता येतील. 

 

Web Title: Here's how you can withdraw cash without using credit or debit card at these 3 banks' ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.