जीएसटीमध्ये मोठी कपात, रोजच्या वापरातल्या 177 वस्तू झाल्या स्वस्त

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 1:58pm

जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेचे सदस्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली.

नवी दिल्ली - जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आकारण्यात येणा-या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. 227 पैकी फक्त 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. अन्य 177 वस्तू 28 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमधून 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे च्युईंगम ते डिटरजंटपर्यंत वस्तू स्वस्त झाल्या आहेत. 

आसामच्या गुवहाटी येथे सुरु असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटी परिषदेचे सदस्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर  28 टक्के जीएसटी आकारण्याला मोठा विरोध होता. त्यामुळे फक्त आलिशान, चैनींच्या 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. 

1 जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टॅक्स स्लॅब जीएसटीमध्ये आहेत. जुलै महिन्यात हा कर लागू झाल्यानंतर 227 वस्तू 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आहेत. ग्रेनाईट, दाढीचे सामान, सौंदर्य प्रसाधन, मार्बल, चॉकलेट, च्युविंग गम, शेव्हींग क्रिम आणखी स्वस्त होणार आहे. एसी हॉटेलमध्ये बसल्यानंतर लागणारा 18 टक्के जीएसटी 12 टक्के करण्याची शिफारस मंत्रिगटाने केली आहे. 

व्यापार कडून आणखी

Sabarimala Temple : रक्तानं माखलेलं सॅनिटरी पॅड घेऊन मित्राच्या घरी जाणार का?, स्मृती इराणींचं वादग्रस्त विधान
CBI Vs CBI : अस्थाना यांना तात्पुरता दिलासा; न्यायालयाकडून 29 ऑक्टोबरपर्यंत कारवाईस स्थगिती 
CBI Vs CBI : राकेश अस्थाना न्यायालयाला शरण; मोठी कारवाई न करण्याची मागणी
VIDEO : माझी इज्जत ठेवा, पार्टी गेली तेल लावत - काँग्रेस आमदाराचा अजब प्रचार
CBI अधिकाऱ्यांमध्ये दरी; मोदी सोपवणार 'हुकमी एक्क्या'कडे जबाबदारी

आणखी वाचा