Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारचं आणखी एक मोठं गिफ्ट, आता ग्रॅच्युइटीवर मिळणार जास्त फायदा

सरकारचं आणखी एक मोठं गिफ्ट, आता ग्रॅच्युइटीवर मिळणार जास्त फायदा

सरकारनं छोट्या छोट्या योजनांवर व्याजदर वाढवल्यानंतर आता आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 04:30 PM2018-10-10T16:30:32+5:302018-10-10T18:01:24+5:30

सरकारनं छोट्या छोट्या योजनांवर व्याजदर वाढवल्यानंतर आता आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे.

government hikes interest for gratuity funds to 8 percent know everything | सरकारचं आणखी एक मोठं गिफ्ट, आता ग्रॅच्युइटीवर मिळणार जास्त फायदा

सरकारचं आणखी एक मोठं गिफ्ट, आता ग्रॅच्युइटीवर मिळणार जास्त फायदा

नवी दिल्ली- सरकारनं छोट्या छोट्या योजनांवर व्याजदर वाढवल्यानंतर आता आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, गैर-सरकारी प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीवरचे व्याजदर 7.6 टक्क्यांवरून वाढवून 8 टक्के करण्यात आले आहेत. नवे व्याजदर 31 डिसेंबर 2018च्या तिमाहीसाठी लागू असणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयानं 4 ऑक्टोबरला स्पेशल डिपॉझिट स्कीम (एसडीएस) 1975च्या अंतर्गत संशोधन करून हे नवे व्याजदर लागू केले आहेत. 

काय होणार याचा फायदा- एसडीएसचे व्याजदर वाढवल्यानं गैर-सरकारी पीएफ, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीवर निश्चित स्वरूपात जास्त फायदा मिळण्यास मदत होणार आहे. या फंडांमध्ये गुंतवणूक करणा-या कर्मचारी आणि लाभार्थ्यांना मोठ्या कालावधीसाठी फायदा मिळणार आहे. परंतु त्यांना सरकार आणि गुंतवणुकीच्या निर्देशांचं पालन करावं लागेल. त्यामुळे आता नोकरी करणा-यांना ग्रॅच्युइटीवर जास्त फायदा मिळणार आहे. 

काय असतं एसडीएस- केंद्र सरकारनं जमा योजनांवर व्याजदर ठरवण्यासाठी एसडीएसला 1 जुलै 1975ला सुरुवात केली आहे. या योजनेचा उद्देश गैर सरकारी पीएफ, पेन्शन, ग्रॅच्युइटी फंड, जीवन विमा निगम(एलआयसी)साठी असलेले फंड आणि कर्मचा-यांना जास्त परतावा मिळवून देण्याचा आहे. जेव्हा या फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते, तेव्हा सरकार त्यातील रकमेवर व्याज देत असते.  

व्याजदर वाढले- 31 मार्च 2018च्या तिमाहीत व्याजदर 7.6 टक्के होतं. तर जून आणि सप्टेंबर तिमाहीमध्ये व्याजदर 7.6 टक्के होते. सरकारनं आता व्याजदर वाढवून 8 टक्के केले आहेत. 

Web Title: government hikes interest for gratuity funds to 8 percent know everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा