Lokmat Money > बिझनेस न्यूज > खुशखबर! चालू खात्याला मुदतठेव योजनेची जोड; जन स्मॉल फायनान्स बँकेची सुविधा

खुशखबर! चालू खात्याला मुदतठेव योजनेची जोड; जन स्मॉल फायनान्स बँकेची सुविधा

जन स्मॉल फायनान्स बँकेच्या खातेदारांना त्यांच्या चालू खात्यातील रक्कमेचे रुपांतर एका सुविधेद्वारे मुदतठेवीत करता येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 07:03 AM2019-01-12T07:03:58+5:302019-01-12T07:04:33+5:30

जन स्मॉल फायनान्स बँकेच्या खातेदारांना त्यांच्या चालू खात्यातील रक्कमेचे रुपांतर एका सुविधेद्वारे मुदतठेवीत करता येणार आहे.

Good news! Fixed Deposit linked to current account; Public Small Finance Bank facility | खुशखबर! चालू खात्याला मुदतठेव योजनेची जोड; जन स्मॉल फायनान्स बँकेची सुविधा

खुशखबर! चालू खात्याला मुदतठेव योजनेची जोड; जन स्मॉल फायनान्स बँकेची सुविधा

बंगळुरु : जन स्मॉल फायनान्स बँकेच्या खातेदारांना त्यांच्या चालू खात्यातील रक्कमेचे रुपांतर एका सुविधेद्वारे मुदतठेवीत करता येणार आहे. बँकेने नुकतेच आॅटोस्वीप अर्थात स्वयंचलित सुविधेचे उद्घाटन केले. अशा चालू खात्यांमधील मुदतठेवीवर बँक वर्षाला ८.५ टक्के इतके आकर्षक व्याजही देणार आहे.

या सेवेचे उद्घाटन करताना जन स्मॉल फायनान्स बँकेचे मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राईज विभागाचे प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष रॅबीन स्टीफन म्हणाले की, आमच्या बँकेच्या सर्वच सुविधा खातेदारांना चांगली सेवा कशी देता येईल याचा विचार करून विकसित केल्या आहेत. चालू खाते आॅटोस्वीप सेवाही ही त्यापैकीच एक आहे. चालू खात्यात अधिक काळ वापराविना पडून असलेल्या रकमेवर खातेदारांना ८.५ टक्के व्याज दिले जाईल. या खात्यांमधील मुदत ठेवीत रुपांतरीत झालेली रक्कम खातेदारांना व्यापारधंद्यात गरजेनुसार काढता येईल. बँक सध्या निमयित मुदतठेवींवर ९ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना मुदतठेवींवर ९.६ टक्के व्याज देते. मुदतीआधी ठेव काढून न घेणाऱ्यांना ९.२५ टक्के व्याज देते. बंगळुरुमध्ये मुख्यालय असलेल्या जन स्मॉल फायनान्स बँकेचे पूर्वीचे नाव जनलक्ष्मी फायनान्शिअल सर्व्हिसेस असे होते. २०१५ साली या वित्तीय संस्थेला स्मॉल फायन्सास बँकेचा परवाना मिळाला.
 

Web Title: Good news! Fixed Deposit linked to current account; Public Small Finance Bank facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.