Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याची झळाळी वाढली; दोनच दिवसांत तब्बल ९०० रुपयांनी वधारलं

सोन्याची झळाळी वाढली; दोनच दिवसांत तब्बल ९०० रुपयांनी वधारलं

अनेक वर्षांनंतर एकाच वेळी झालेली ही मोठी वाढ ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:49 AM2019-06-22T04:49:03+5:302019-06-22T06:49:23+5:30

अनेक वर्षांनंतर एकाच वेळी झालेली ही मोठी वाढ ठरली

The gold price was up by Rs 9 00 in just two days | सोन्याची झळाळी वाढली; दोनच दिवसांत तब्बल ९०० रुपयांनी वधारलं

सोन्याची झळाळी वाढली; दोनच दिवसांत तब्बल ९०० रुपयांनी वधारलं

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची मागणी वाढल्याने दोन दिवसांत सोन्याच्या भावात ९०० रुपये वाढ झाली आहे. सोन्याचा भाव ३३ हजार ३०० रुपयांवरून ३४,२०० वर पोहोचला आहे. अनेक वर्षांनंतर एकाच वेळी झालेली ही मोठी वाढ ठरली आहे. चांदीच्या दरातही वाढ होऊन ती ३९ हजार रुपये प्रती किलोवर गेली आहे.

सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी, तसेच अमेरिकन डॉलरचा मोठा परिणाम होतो. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सुधारत गेला की, सोन्याचे भाव कमी होतात. गेल्या आठवड्यापासून रुपयात सुधारणा होत असतानाही सोन्याचे भाव वाढत गेले. अमेरिका व इंग्लंडमध्ये सोन्याचे भाव वाढल्याने त्याचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दलाल सक्रीय झाल्याने कृत्रिम मागणी वाढली व सोन्याला झळाली आल्याचे जाणकारांनी सांगितले.

Web Title: The gold price was up by Rs 9 00 in just two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं