lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गीतांजली समूहाचे ज्वेलरी पार्क रद्द

गीतांजली समूहाचे ज्वेलरी पार्क रद्द

हा प्रकल्प १०० एकरवर उभा राहणार होता. रामदासपूर येथे ३० एकर जमीन कंपनीला देण्यातही आली होती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:10 AM2018-04-28T01:10:36+5:302018-04-28T01:10:36+5:30

हा प्रकल्प १०० एकरवर उभा राहणार होता. रामदासपूर येथे ३० एकर जमीन कंपनीला देण्यातही आली होती.

Gitanjali Group's Jewelery Park canceled | गीतांजली समूहाचे ज्वेलरी पार्क रद्द

गीतांजली समूहाचे ज्वेलरी पार्क रद्द

भुवनेश्वर : गीतांजली इन्फ्राटेक लि. समूहाचा जेम्स, ज्वेलरी, लाइफ स्टाईल व लक्झरी वस्तूंचा पार्क ओडिशा सरकारने रद्द केला आहे. ६३६ कोटी रुपये खर्चून हा पार्क उभा केला जाणार होता. पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या मेहूल चोकसी याच्या मालकीची ही कंपनी आहे. पीएनबी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बासनातच गुंडाळला

ओडिशाचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितले की, ही कंपनी संकटात आहे, असे दिसते. आम्हाला बोलता येईल, असे येथे कोणीही दिसत नाही. अशा परिस्थितीत प्रकल्प उभा राहू शकत नाही. त्यामुळे हा प्रकल्प आम्ही बासनात गुंडाळला आहे. हा प्रकल्प १०० एकरवर उभा राहणार होता. रामदासपूर येथे ३० एकर जमीन कंपनीला देण्यातही आली होती.

Web Title: Gitanjali Group's Jewelery Park canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.