Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंधन दरवाढीची ‘गाडी’ थांबेना! १४ मेपासून पेट्रोल ३.४९, डिझेल ३.३६ रु. महागले

इंधन दरवाढीची ‘गाडी’ थांबेना! १४ मेपासून पेट्रोल ३.४९, डिझेल ३.३६ रु. महागले

कर्नाटक निवडणूक संपताच १४ मेपासून सुरू झालेला पेट्रोल-डिझेलचा ‘अश्वमेध’ सलग १४ व्या दिवशीही कायम आहे. या १४ दिवसांत पेट्रोल ३.४९ तर डिझेल ३.३६ रुपये प्रति लिटरने महागले. अवघ्या १४ दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरातील एवढी ही वाढ मागील २ वर्षातील सर्वाधिक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:49 AM2018-05-28T00:49:40+5:302018-05-28T00:59:00+5:30

कर्नाटक निवडणूक संपताच १४ मेपासून सुरू झालेला पेट्रोल-डिझेलचा ‘अश्वमेध’ सलग १४ व्या दिवशीही कायम आहे. या १४ दिवसांत पेट्रोल ३.४९ तर डिझेल ३.३६ रुपये प्रति लिटरने महागले. अवघ्या १४ दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरातील एवढी ही वाढ मागील २ वर्षातील सर्वाधिक आहे.

Fuel price hike continue! From May 14, petrol will cost Rs 3.49, diesel 3.36 Expensive | इंधन दरवाढीची ‘गाडी’ थांबेना! १४ मेपासून पेट्रोल ३.४९, डिझेल ३.३६ रु. महागले

इंधन दरवाढीची ‘गाडी’ थांबेना! १४ मेपासून पेट्रोल ३.४९, डिझेल ३.३६ रु. महागले

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कर्नाटक निवडणूक संपताच १४ मेपासून सुरू झालेला पेट्रोल-डिझेलचा ‘अश्वमेध’ सलग १४ व्या दिवशीही कायम आहे. या १४ दिवसांत पेट्रोल ३.४९ तर डिझेल ३.३६ रुपये प्रति लिटरने महागले. अवघ्या १४ दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरातील एवढी ही वाढ मागील २ वर्षातील सर्वाधिक आहे.
मुंबईत २४ एप्रिलपासून १३ मेपर्यंत पेट्रोल ८२.४८ रुपयांवर स्थिर होते. निवडणूक रणधुमाळी संपताच तेल कंपन्यांनी १४ मेपासून दरवाढ सुरू केली. २७ मे रोजी मुंबईत पेट्रोलचा दर ८५.९७ रुपये प्रति लिटर झाला आहे. हीच स्थिती डिझेलचीसुद्धा आहे. मुंबईत २४ एप्रिलला डिझेलच्या दरात १९ पैसे वाढ करण्यात आली. त्यानंतर १३ मेपर्यंत डिझेल ७०.२० रुपये प्रति लिटरवर स्थिर होते. १४ मे रोजी त्यात २३ पैसे वाढ करण्यात आली. २७ मे रोजी मुंबईत डिझेलचा दर ७३.५६ रुपये प्रति लिटर झाला.

अनुदान वाचविले? पैशांचे केले काय?

- अनुदानात कपात केल्याने पेट्रोल-डिझलेच्या दरात वाढ झाल्याचे केंद्र सरकार सांगत आहे. अनुदानात कपात केल्यानंतर वाचलेला निधी ग्रामीण भागातील मोफत एलपीजी कनेक्शनसाठी खर्च केला जात आहे, असे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे.
- पण ‘उज्ज्वला’ योजनेसाठी नेमका किती निधी खर्च केला जात आहे, याबाबत सरकारकडून कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या विषयी सरकार श्वेतपत्रिका का जाहिर करीत नाही, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

कायम असमतोल
मागील चार वर्षांची आकडेवारी पाहिल्यास याआधी १७ मे २०१६ ते १ जून २०१६ दरम्यान पेट्रोलच्या दरात ४.०६ रुपये प्रति लीटरने वाढ झाली होती. १६ आॅगस्ट २०१६ ते १६ सप्टेंबर २०१६ दरम्यान पेट्रोल ५.६० रुपये प्रति दराने वाढले होते. नोव्हेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या दरम्यान पेट्रोलच्या दरात ५.१७ रुपये प्रति लीटर वाढ झाली होती. १० मार्च ते ५ एप्रिल २०१५ दरम्यानही पेट्रोल दर ५.२१ रुपये वाढविले होते. डिझेल एप्रिल ते मे २०१५ या काळात ५.६० रुपये प्रति दराने डिझेलचे दर वधारले होते. मे २०१५ मध्ये डिझेल २.९९ रुपये महागले आले होते.

२०११-१२ मध्ये १७६ दिवस दर स्थिर : यूपीए सरकारच्या काळातही डिसेंबर २०११ ते मे २०१२ दरम्यान पेट्रोलच्या दरात तब्बल ७.९१ रुपये प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती, पण त्या वेळी १ डिसेंबर २०११ ते २४ मे २०१२ हे तब्बल १७६ दिवस पेट्रोल ७०.६६ रुपये प्रति लीटरवर स्थिर होते.

Web Title: Fuel price hike continue! From May 14, petrol will cost Rs 3.49, diesel 3.36 Expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.