Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्यात येणारी विदेशी गुंतवणूक ३५ टक्के घटली

राज्यात येणारी विदेशी गुंतवणूक ३५ टक्के घटली

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र, ‘मेक इन महाराष्ट्रा’च्या नावे गुंतवणुकीचा डमरू राज्य सरकार वाजवत असले, तरी प्रत्यक्षात राज्यात येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीत ३५ टक्के घट झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:21 AM2018-07-16T00:21:26+5:302018-07-16T00:21:38+5:30

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र, ‘मेक इन महाराष्ट्रा’च्या नावे गुंतवणुकीचा डमरू राज्य सरकार वाजवत असले, तरी प्रत्यक्षात राज्यात येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीत ३५ टक्के घट झाली आहे.

 Foreign investment in the state decreases by 35 percent | राज्यात येणारी विदेशी गुंतवणूक ३५ टक्के घटली

राज्यात येणारी विदेशी गुंतवणूक ३५ टक्के घटली

नवी दिल्ली : ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र, ‘मेक इन महाराष्ट्रा’च्या नावे गुंतवणुकीचा डमरू राज्य सरकार वाजवत असले, तरी प्रत्यक्षात राज्यात येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीत ३५ टक्के घट झाली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अहवालात हे तथ्य बाहेर आले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात देशात झालेल्या विदेशी गुंतवणुकीचे आकडे विभागाने जाहीर केले आहेत.
महाराष्टÑात मागील आर्थिक वर्षात (२०१७-१८) ८६ हजार २४४ कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक आली. हा आकडा २०१६-१७ मध्ये १.३१ लाख कोटी रुपये होता. देशातील गुंतवणुकीत राज्याचा वाटा सर्वाधिक ३१ टक्के आहे, पण हा वाटा मागील वर्षी ४५ टक्के होता.
एकीकडे राज्यातील एकूण विदेशी गुंतवणुकीत घट झाली असताना वाटासुद्धा कमी झाला आहे. देशाच्या एकूण विदेशी
गुंतवणुकीतही १ टक्का घट झाली. २०१६-१७ या आर्थिक वर्षात
देशात २.९१ लाख कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक देशात आली होती. २०१७-१८ मध्ये हा आकडा २.८८ लाख कोटी रुपयांवर आला.
अमेरिका, जर्मनीसह प्रमुख
देशांच्या गुंतवणुकीला ‘ब्रेक’
अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, जपान हे भारतात गुंतवणूक करणारे देश आहेत, पण या देशांमधून येणारी गुंतवणूक २०१७-१८ मध्ये घटली आहे. त्याचा फटका एकूण गुंतवणुकीला बसला. भारतात गुंतवणूक करणाºया दहा प्रमुख देशांमध्ये फक्त यूएई व सिंगापुरमधून येणारी गुंतवणूक वाढली.
>सेवा क्षेत्राला २५ टक्क्यांचा फटका
सेवा क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीलाच २५ टक्क्यांचा जबर फटका बसला आहे. देशात २०१६-१७ या आर्थिक वर्षात ८,६८४ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली होती.
२०१७-१८ या आर्थिक वर्षात मात्र ही गुंतवणूक ६,७०९ अब्ज डॉलरपर्यंत घसरली. सुदैवाने दूरसंचार, व्यापार, आॅटोमोबाइल, बांधकाम या क्षेत्रात चांगली गुंतवणूक आल्याने एकूण गुंतवणुकीत एक टक्काच घट झाली.

Web Title:  Foreign investment in the state decreases by 35 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.