Lokmat Money > बिझनेस न्यूज > श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल; संपत्तीचा आकडा वाचणंही कठीण!

श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल; संपत्तीचा आकडा वाचणंही कठीण!

फोर्ब्स मॅगझिननं श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिज(आरआईएल)चे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या स्थानी आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 12:18 PM2018-10-04T12:18:40+5:302018-10-04T12:18:51+5:30

फोर्ब्स मॅगझिननं श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिज(आरआईएल)चे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या स्थानी आहेत.

forbes list mukesh ambani as indias richest know top 10 list | श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल; संपत्तीचा आकडा वाचणंही कठीण!

श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल; संपत्तीचा आकडा वाचणंही कठीण!

नवी दिल्ली- फोर्ब्स मॅगझिननं श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिज(आरआईएल)चे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या स्थानी आहेत. फोर्ब्स इंडियानं जाहीर केलेल्या ''इंडियाज 100 रिचेस्ट लिस्ट"मध्ये मुकेश अंबानींनी लागोपाठ अकराव्यांदा पहिलं स्थान पटकावलं आहे.

मुकेश अंबानी यांच्याकडे 4730 कोटी डॉलर(3.40 लाख कोटी)ची संपत्ती आहे. तसेच विप्रोचे अध्यक्ष अजिम प्रेमजी या यादीत दुस-या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2100 कोटी डॉलर(1.51लाख कोटी रुपये) आहे. आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल हे 1830 कोटी डॉलर(1.31 लाख कोटी रुपये)सह तिस-या क्रमांकावर आहेत. चौथ्या स्थानी हिंदुजा ब्रदर्सना संधी मिळाली आहे. अशोक, गोपीचंद, प्रकाश आणि श्रीचंद हिंदुजा यांची एकूण संपत्ती 1800 कोटी डॉलर(1.29 लाख कोटी रुपये) आहे. बांधकाम व्यावसायात दबदबा असलेल्या शापूरजी पालोनजीचे मालक पालोनजी मिस्त्री या यादीत पाचव्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1570 कोटी डॉलर(11.3 लाख कोटी रुपये) आहे.

देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर 1460 कोटी डॉलर (10.5 लाख कोटी रुपये)च्या संपत्तीसह सहाव्या स्थानी आहेत. तर सातवं स्थान गोदरेज समूहाला देण्यात आलं आहे. त्यांची एकूण संपत्ती 1400 कोटी डॉलर(10 लाख कोटी रुपये) आहे. सन फार्माचे मालक दिलीप सांघवी या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1260 कोटी डॉलर(90,735 कोटी रुपये) आहे. इंडियाज 100 रिचेस्ट लिस्टमध्ये नवव्या स्थानी कुमार मंगलम बिर्ला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1250 कोटी डॉलर(जवळपास 90000 कोटी रुपये)च्या जवळपास आहे. यादीत दहाव्या स्थानी गौतम अडानी आहेत, त्यांनी एकूण संपत्ती 1190 कोटी डॉलर(85,682 कोटी रुपये) आहे. 

Web Title: forbes list mukesh ambani as indias richest know top 10 list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.