Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर भर

बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर भर

विदेशी गुंतवणूकदारांनी आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारातून ३२,००० कोटी रुपये काढून घेतले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 02:59 AM2018-10-22T02:59:49+5:302018-10-22T02:59:57+5:30

विदेशी गुंतवणूकदारांनी आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारातून ३२,००० कोटी रुपये काढून घेतले आहेत.

Focus on the sale of foreign investors in the market | बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर भर

बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर भर

नवी दिल्ली : विदेशी गुंतवणूकदारांनी आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारातून ३२,००० कोटी रुपये काढून घेतले आहेत. हा आकडा सप्टेंबर महिन्यात काढून घेण्यात आलेल्या २१ हजार कोटी रुपयाहून अधिक आहे. या आधी जुलै-आॅगस्टमध्ये गुंतवणूकदारांंनी रोखे व शेअर बाजारात ७,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
प्राप्त आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी १ ते १९ आॅक्टोबरदरम्यान १९,८१० कोटी रुपयांचे शेअर्स विक्री केले, तसेच रोखे बाजारातूनही १२,१६७ कोटी रुपये काढले. या वर्षातील काही महिने वगळता, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीवरच भर दिला. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजरातून ३३,००० कोटी आणि रोख बाजारातून ६०,००० कोटी रुपये काढले आहेत.

Web Title: Focus on the sale of foreign investors in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा