ठेवीदारांच्या हितांसाठीच एफआरडीआय, वित्त खात्याचे निवेदन  

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 12:41am

फायनान्शिअल रिझोल्युशन अँड डिपॉजिट इन्शुरन्स (एफआरडीआय) विधेयक ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी, तसेच सध्याच्या त्यांच्या हक्कात वाढ करण्यासाठीच आणण्यात येत आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

नवी दिल्ली - फायनान्शिअल रिझोल्युशन अँड डिपॉजिट इन्शुरन्स (एफआरडीआय) विधेयक ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी, तसेच सध्याच्या त्यांच्या हक्कात वाढ करण्यासाठीच आणण्यात येत आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. एफआरडीआय विधेयकामुळे बँकांमधील आपल्या ठेवींवरील ठेवीदारांचा हक्कच संपुष्टात येणार असल्याच्या बातम्या अलीकडे प्रसिद्ध झाल्या होत्या. बुडीत निघालेल्या बँकांवर आपल्या ठेवीदारांचे पैसे देण्याचे बंधन राहणार नाही. ठेवींचे रूपांतर समभागांत करण्याचा हक्क बँकांना राहील, अशा तरतुदी विधेयकात असल्याचे बातम्यांत म्हटले होते. या पार्श्वभूमीवर वित्त मंत्रालयाने एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीसह अनेक समस्यांसाठी सर्वंकष कायदेशीर चौकटच सध्या भारतात उपलब्ध नाही. ती या विधेयकामुळे निर्माण होणार आहे. सध्या निपटाºयाशी संबंधित ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत, त्या फारच मर्यादित आहेत, तसेच त्यासंबंधीच्या प्रक्रियेचाही अभावच आहे.

संबंधित

विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा भारताचे सामने कधी आणि कुठे
विराटला मिळणार खेल रत्न पुरस्कार? बीसीसीआयने केली शिफारस
बँका सलग चार दिवस बंद
नामको बॅँकेला ४१ लाखांना गंडा : नाशिकमधील कारविक्री करणाऱ्या दालनांच्या नावांचा वापर
खोटी कागदपत्रे सादर करून पीक कर्ज उचलले;मानवत येथील घटना 

व्यापार कडून आणखी

२0१५ नंतरच एनपीएमध्ये वाढ, पंतप्रधान मोदींचा संबंध नाही : आरबीआयने निर्बंध कडक केल्याचा परिणाम
एप्रिल महिन्याच्या शेवटचे तीन दिवस बँका राहणार बंद, पैशांची चणचण भासणार
कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा
२०००च्या नोटा परतेनात!
ई-वाहनांना आता तैवानचे तंत्रज्ञान

आणखी वाचा