In the face of Gujarat elections, the government announced the export promotion scheme of Rs 8,500 crore | गुजरात निवडणुकीच्या तोंडावर सरकारने जाहीर केली 8,500 कोटींची निर्यात प्रोत्साहन योजना

नवी दिल्ली - जीएसटीवरुन व्यापारी वर्गामध्ये असलेली नाराजी कमी करण्यासाठी तसेच निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 8,500 कोटींचा निर्यात प्रोत्साहन भत्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कृषी क्षेत्र, चामडयाच्या वस्तू, गालीचे आणि सागरी उत्पादनांचा या निर्यात प्रोत्साहन भत्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा 8500 कोटींचा निर्यातीसंबंधीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गुजरातमधल्या छोटया व्यापा-यांमध्ये जीएसटीवरुन नाराजी आहे. निर्यातीसंबंधीच्या सरकारी धोरणांवरुन निर्यातदार केंद्र सरकारवर मोठया प्रमाणावर टीका करत होते. 

नोव्हेंबर महिन्यापासून 8,540 कोटींची निर्यात प्रोत्साहन भत्त्याची ही योजना लागू होत आहे. या योजनेतून तयार कपडयांच्या व्यवसायाला 2,743 कोटी रुपयांपर्यंत लाभ मिळतील. नव्या योजनेमागे प्रक्रिया अधिकाधिक सोपी करुन निर्यातीला चालना देण्याचा उद्देश आहे.