Lokmat Money > बिझनेस न्यूज > फसवणूक झाल्यास जबाबदारी विक्रेता आणि उत्पादक दोघांचीही

फसवणूक झाल्यास जबाबदारी विक्रेता आणि उत्पादक दोघांचीही

वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचे वजन, आकार आदींबाबत समस्या निर्माण झाल्यास वैधमापन शास्त्र नियमांनुसार विक्रेता दोषी ठरतो, पण आॅनलाइन खरेदीत ई-कॉमर्स कंपनी दोषी ठरत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 03:56 AM2018-07-21T03:56:31+5:302018-07-21T03:56:41+5:30

वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचे वजन, आकार आदींबाबत समस्या निर्माण झाल्यास वैधमापन शास्त्र नियमांनुसार विक्रेता दोषी ठरतो, पण आॅनलाइन खरेदीत ई-कॉमर्स कंपनी दोषी ठरत नाही

In the face of fraud, both the seller and the producer are responsible | फसवणूक झाल्यास जबाबदारी विक्रेता आणि उत्पादक दोघांचीही

फसवणूक झाल्यास जबाबदारी विक्रेता आणि उत्पादक दोघांचीही

मुंबई : वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचे वजन, आकार आदींबाबत समस्या निर्माण झाल्यास वैधमापन शास्त्र नियमांनुसार विक्रेता दोषी ठरतो, पण आॅनलाइन खरेदीत ई-कॉमर्स कंपनी दोषी ठरत नाही, असे आयटी कायदा सांगतो. हा संभ्रम दूर करण्याची मागणी ‘फिक्की’ने केली आहे.
डबाबंद वस्तूवर वजन, लीटर, आकार, उत्पादनाचे ठिकाण, तारीख, मुदत संपण्याची तारीख, किंमत (एमआरपी) या बाबींची नोंद असणे अनिवार्य आहे. छापण्यात आल्यानुसार वस्तू नसल्यास विक्रेत्याला दंड होतो. हीच वस्तू आॅनलाइन खरेदी केल्यास कंपनी जबाबदार ठरत नाही.
ई-कॉमर्स कंपनी विक्रेता असताना उत्पादक ग्राहकांना माहीत नसतो. वस्तूमध्ये दोष आढळून आल्यास ई-कॉमर्स कंपनी कायद्याचा दाखला देत त्रुटीची जबाबदारी घेत नाही. सर्व आॅनलाइन कंपन्यांना आयटी कायदा लागू होतो व वैधमापन शास्त्र विभागाचे नियम लागू नाहीत. त्यामुळे आॅनलाइन खरेदीत फसवणूक होऊ नये, यासाठी आयटी कायदा व वैधमापन शास्त्र कायदा एकमेकांना पूरक असावेत, असे ‘फिक्की’चे म्हणणे आहे.
>जबाबदारी दोघांचीही : वैधमापन शास्त्र विभाग
वस्तूमध्ये दोष आढळून आल्यास ती जबाबदारी ई-कॉमर्स कंपनी व उत्पादक या दोघांचीही असेल, असे राज्याच्या वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.
त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कायद्यानुसार उत्पादकाने वर सात बाबी वस्तूवर छापल्या आहेत की नाही, ही तपासणी करण्याची जबाबदारी विक्रेता या नात्याने ई-कॉमर्स कंपनीची आहे. त्यामुळे ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्यास कायद्यानुसार दोघेही जबाबदार असतील.

Web Title: In the face of fraud, both the seller and the producer are responsible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन