lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > छोट्या उद्योजकांची कर्जेही एनपीएच्या वाटेवर

छोट्या उद्योजकांची कर्जेही एनपीएच्या वाटेवर

कॉर्पोरेट्सने बुडवलेल्या कर्जांमुळे बँका तोट्यात असतानाच, आता छोट्या उद्योजकांची कर्जेही बुडित होण्याच्या वाटेवर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:05 AM2018-09-18T00:05:46+5:302018-09-18T00:12:20+5:30

कॉर्पोरेट्सने बुडवलेल्या कर्जांमुळे बँका तोट्यात असतानाच, आता छोट्या उद्योजकांची कर्जेही बुडित होण्याच्या वाटेवर आहेत.

Even small entrepreneurs' loans are on the NPA route | छोट्या उद्योजकांची कर्जेही एनपीएच्या वाटेवर

छोट्या उद्योजकांची कर्जेही एनपीएच्या वाटेवर

मुंबई : कॉर्पोरेट्सने बुडवलेल्या कर्जांमुळे बँका तोट्यात असतानाच, आता छोट्या उद्योजकांची कर्जेही बुडित होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे मार्च २०१९ अखेरपर्यंत बँकांची स्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. पतमानांकन देणाऱ्या एका संस्थेने ‘इंड-रा’ या अहवालात ही शक्यता व्यक्त केली आहे.

मार्च २०१८ अखेर बँकांमधील बुडित कर्जांचा (एनपीए) आकडा ८ लाख कोटी होता. प्रामुख्याने मोठ्या उद्योजकांना दिलेली कर्जे बुडित खात्यात गेली. त्यापोटी बँकांना भरमसाठ तरतूद करावी लागली. परिणामी चलनात्मक नफा असतानाही २१ पैकी १९ सरकारी बँका विक्रमी तोट्यात गेल्या. काही खासगी बँकांनासुद्धा एनपीएपोटी मोठी तरतूद करावी लागली. चालू आर्थिक वर्षातही या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता नाही. बहुतांश बँकांना एनपीएपोटी ताळेबंदाच्या किमान ३ टक्के तरतूद करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
या अहवालानुसार, सध्या देशात व देशाबाहेर निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीमुळे बिगर कॉर्पोरेट्सची कर्जेही मोठ्या प्रमाणावर थकित होऊ लागली आहेत. मार्चअखेरपर्यंत अशी अनेक कर्जे बुडित खात्यात जाऊ शकतात. सरकारी बँकांनी सर्व प्रकारच्या उद्योगांना जवळपास ४ लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

मागणी नसल्याचा परिणाम
मागणीअभावी उद्योग क्षेत्र कमकुवत झाल्याने या कर्जांची परतफेड विलंबाने होत आहे. परिणामी फक्त स्टेट बँक व बँक आॅफ बडोदा या दोन सरकारी बँकांनाच किंचित दिलासा मिळू शकतो.
पण उर्वरित सर्व सरकारी व खासगी बँकांंना एनपीएपोटी अधिक मोठी तरतूद करावी लागणार आहे.

Web Title: Even small entrepreneurs' loans are on the NPA route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.