lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > GOOD NEWS: महिनाभर बेरोजगार राहिल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार

GOOD NEWS: महिनाभर बेरोजगार राहिल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO)च्या सदस्याला आता महिनाभर बेरोजगार राहिल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 08:59 AM2018-06-27T08:59:45+5:302018-06-27T09:00:14+5:30

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO)च्या सदस्याला आता महिनाभर बेरोजगार राहिल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार आहे.

EPFO members can withdraw 75% funds after 30 days of job loss | GOOD NEWS: महिनाभर बेरोजगार राहिल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार

GOOD NEWS: महिनाभर बेरोजगार राहिल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार

नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO)च्या सदस्याला आता महिनाभर बेरोजगार राहिल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार आहे. या व्यतिरिक्त तुमचं पीएफ खातंही सुरूच राहणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्तांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार म्हणाले, या योजनेंतर्गत सलग एक महिन्यापर्यंत बेरोजगार असल्यास ईपीएफओचा कोणताही सदस्य 75 टक्क्यांपर्यंत रक्कम खात्यातून काढू शकणार आहे. तसेच त्याचे खातेही सुरूच राहणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952च्या तरतुदीतील सुधारणेनुसार दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यास ईपीएफओ सदस्य स्वतःच्या खात्यातील उर्वरित 25 टक्के रक्कम काढून खातंही बंद करू शकतो. ईटीएफ म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेट फंडमध्ये ईपीएफओची गुंतवणूक 47 हजार 431.24 कोटी रुपयांच्या जवळपास जाऊन पोहोचली आहे. लवकरच हा आकडा एक लाख कोटींच्या घरात जाईल. या गुंतवणुकीवर 16.07 टक्के परतावा मिळत आहे, अशी माहिती संतोष गंगवार यांनी दिली.

जाणून घ्या काय आहे योजना
या नव्या योजनेंतर्गत व्यक्ती स्वतःचं पीएफ खातं सुरूच ठेवू शकतो. या खात्याचा उपयोग दुस-या नोकरीमध्येही करता येऊ शकतो. पहिल्यांदा 60 टक्के रक्कम काढता येऊ शकते, असा नियम होता. परंतु सीबीटीनं याची मर्यादा वाढवून 75 टक्के केली आहे. तसेच एक्स्चेंज ट्रेडेट फंडची मर्यादाही 1 जुलै 2019पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

Web Title: EPFO members can withdraw 75% funds after 30 days of job loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.